पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकूण ५०,००० रु.ची मदत जमा झाली. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांच्या अनुपस्थितीत खासेराव जाधवांनी अध्यक्षीय स्थान भूषवले.

सयाजीरावांप्रति कृतज्ञता

 ७-८ एप्रिल १९२८ दरम्यान सोलापूर येथे झालेल्या २० व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधवांची निवड करण्यात आली होती. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष भगवानराव पिलीवकर यांनी आपल्या भाषणात 'सयाजीराव महाराजांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक मराठा तरुण परदेशात जाऊन विद्यासंपन्न झाल्या'ची कृतज्ञता व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे या अधिवेशनाचे अध्यक्ष भास्करराव जाधवांचे शिक्षणदेखील स्थापनेपासून सयाजीरावांचे भक्कम आर्थिक पाठबळ लाभलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर झाले होते. हा एक सुखद 'योगायोग' होता.

 २० मार्च १९३३ रोजी पुण्यातील ७४ संस्थांनी एकत्र येत सयाजीराव महाराजांचा सत्कार केला. यावेळी मराठा समाजातर्फे महाराजांना मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी शाहूंच्या मराठा बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी पी. सी. पाटील यांनी दिलेला कबुलीजबाब मराठ्यांच्या उत्कर्षातील सयाजीरावांचे स्थान निश्चित करणारा आहे. या भाषणात पी. सी. पाटील म्हणतात, “मराठा समाजांत शिक्षणाच्या वृद्धीसाठी आपण जे अत्यंत बहुमोल परिश्रम घेत आहांत त्याबद्दल मराठा समाज अत्यंत

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ३०