पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची वाटचाल

 अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सहावे अधिवेशन २४ ते २६ डिसेंबर १९१२ दरम्यान तुकोजीराव पवार महाराजांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथे पार पडले. सरदार बळवंतराव कदम बांडे हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. स्वागतपर भाषणात बोलताना बळवंतराव कदम यांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या स्थापनेतील सयाजीराव महाराज, गंगारामभाऊ म्हस्के आणि शाहू महाराज यांचे अन्योन्य स्थान स्पष्ट केले होते. अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या कामासाठी आर्थिक साहाय्य उभे करण्याच्या उद्देशाने या अधिवेशनात खासेराव जाधवांनी 'झोळीचा ठराव' मांडला.

 २८-३० डिसेंबर १९९३ दरम्यान नाशिक येथे झालेल्या सातव्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शंकरराव कदम यांनी आपल्या भाषणात स्वत:च्या संस्थानातील मोफत माध्यमिक व उच्चशिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे या दोन राज्यकर्त्यांचा विशेष गौरव केला. तर २७-२९ डिसेंबर १९१७ दरम्यान खामगाव येथे शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात खासेराव जाधवांनी वऱ्हाड प्रांतात वऱ्हाड हायस्कूल काढण्यासाठी झोळीचा ठराव मांडला. यावेळी

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २९