पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋणी राहील यांत शंका नाही. माझ्या वेळी कॉलेजात शिक्षण घेणारे मराठे चार पांचच होते, पण आता ती संख्या ३०० वर गेली आहे. याचे सर्व श्रेय महाराज आपणाला आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही.'

 या प्रसंगी देण्यात आलेल्या मानपत्रातील आशयाचे चिंतन मराठा जातीचा कळवळा' असणाऱ्या एकही संशोधकाने आजअखेर केले नाही. परिणामी मराठा जातीच्या उत्कर्षाचा सलग आणि अधिकृत इतिहास लिहिला गेला नाही. हे मानपत्र म्हणते, “या ठिकाणी मोठ्या अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या सेवेतून निवृत्त झालेले लेफ्टनंट बाबूराव जगताप यांनी श्री शिवाजी मराठा सोसायटीतर्फे मराठी व इंग्रजी शाळा चालवून गेल्या १५ वर्षांत व तत्सम जातींमध्ये शिक्षणाचे प्रसारास बरीच मदत केली आहे. आज सोसायटीने चालविलेल्या तीन शाळांमधून ९०० विद्यार्थी असून १३० पुढारलेल्या जातीचे, ५३० मराठा जातीचे व २४० तत्सम जातींचे आहेत. रा. बाबूराव सारखा कार्यनिष्ठ पुरुष महाराज साहेबांनी आमच्या स्वाधीन केल्याबद्दल आम्ही महाराजांचे ऋणी आहोत.”

 अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त २५ बैठकांचा सविस्तर वृत्तांत छापून प्रसिद्ध व्हावा असे १९९२९ च्या २१ व्या बैठकीत सातव्या ठरावामध्ये ठरले

होते. त्यानुसार ऑगस्ट १९४९ मध्ये 'गेली पंचवीस अधिवेशने (अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचा इतिहास)' हा ग्रंथ 'वत्सला '

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ३१