पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याप्रसंगी सयाजीरावांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेला केलेल्या सूचनांचे विवेचन अत्यावश्यक ठरते.

 १) मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने अभ्यासक्रमात काही महत्त्वाचे बदल करणे जरुरीचे आहे आणि अशा बदललेल्या अभ्यासक्रमास सर्व मराठा संस्थांमधून वाव मिळावा.

 २) व्यवहारोपयोगी शेतकी ज्ञान, अर्थशास्त्राचे जरुरीपुरते ज्ञान, ठोकळ कायद्याचे ज्ञान आणि वसुलीचा कारभार यांची खेड्यात अत्यंत जरुरी आहे. या बाबींचा प्रामुख्याने अभ्यासक्रमांमध्ये विचार व्हावा.

 ३) शारीरिक शिक्षण व लष्करी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता मराठा शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांना योग्य नोकरी मिळवून देण्यासाठी परिषदेमार्फत एक कमिटी नेमली जावी.

 ४) विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी आवड उत्पन्न होण्यासाठी काही अंशी शिष्यवृत्त्या व बक्षिसेही ठेवली जावीत. प्रत्येक वर्गामध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून द्यावी.

 मराठा समाजाची आजची स्थिती लक्षात घेता ११३ वर्षांपूर्वी सयाजीरावांनी केलेल्या सूचना आजही तंतोतंत लागू पडतात. सयाजीरावांनी या भाषणात मार्टिन ल्युथर किंगपासून संत एकनाथ, संत नामदेव आणि तुकाराम महाराजांपर्यंतचे दाखले देत जातीय - धार्मिक ऐक्य साधून समाजाची प्रगती करण्याची

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २६