Jump to content

पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपभोगशून्य ‘ऋषीत्वाचा’हा आविष्कार होता. सयाजीरावांनी आपल्या खाजगी खर्चाची तपासणी सरकारी अधिकाऱ्याच्या अखत्यारित आणून शिवाजी महाराजांचा ‘वारसा’ पुढे चालवला. विशेष बाब म्हणजे १९३६ मध्ये राज्यकारभाराच्या हीरकमहोत्सवीप्रसगं ी सयाजीरावांनी अस्पृश्योद्धाराच्या कामासाठी खाजगी फंडातून १ कोटी रु.ची तरतूद करत उपभोगशून्य राजाचे मूर्तिमंत उदाहरण भारतासमोर ठे वले.

शेतकऱ्यांचे कल्याण
 शेतकऱ्यांची स्थिती सधरून त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शिवाजी महाराजांनी सातत्याने प्रयत्न के ले.मोहिमेवरील आपल्या सभदारांना लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी रयतेवर कोणतीही जबरदस्ती न करता बाजारभावाप्रमाणे फौजेस लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याची ताकीद दिली होती. फौजेने मार्गक्रमण करताना शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस न करण्याची सच ना आपल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना के ली. दुष्काळाच्या महाभीषण सक टात शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांना सारामाफी दिली. तसेच नव्याने लागवडीखाली आलेल्या जमिनींवरील शेतसारा वसलीमध्ये सटू दिली.शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात शिवाजी महाराजांनी के लेली मदत उभा महाराष्ट्र जाणतो.

हाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / ८