पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांनी बडोद्यातील दुष्काळाच्या आपत्तीप्रसगी ४ डिसेंबर १८९९ ते मार्च १९०० या चार महिन्यांच्या काळात २१,१७३चौ.कि.मी.आकाराच्या आणि चार प्रांतांत विभागलेल्या आपल्या संस्थानाचा दुष्काळ पाहणी दौरा के ला. या दौऱ्यात सयाजीरावांनी महसली अधिकाऱ्यांना खेडी पिंजून काढून निराधारांना मदत करण्याचे आदेश दिले. शेतसारा वसुलीसाठी कोणत्याही कठोर उपाययोजना करण्यास सयाजीरावांनी आपल्या अधिकाऱ्यांना मनाई के ली. शेतसारा भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींना शक्यतो वर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये असा धोरणात्मक निर्णय घेतला. दुष्काळी मदत कार्यात मदत करणारे कामगार आणि महाराजांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचा हुकूम सयाजीरावांनी आपल्या मंत्र्यांना दिला. शिवरायांची परंपरा उन्नत, उत्क्रांत आणि परिपूर्ण करून ‘सराज्य’कसे निर्माण होते याची साक्ष सयाजीरावांनी दुष्काळादरम्यान के लेल्या उपाययोजनांवरून पटते.
 मध्ययुगीन भारतातील राज्यकर्त्यांनी शेतसारा वसल ीचे अधिकार आपल्या राज्यातील वतनदारांना दिले होते. हे वतनदार जनतेची मनमानी पद्धतीने लूट करत. शिवाजी महाराजांनी सारावसलीच्या या पद्धतीत बदल करत धारा पद्धती स्वीकारली. निजामशाहीचा सेनापती मलिक अंबरने ही पद्धत विकसित

के ली होती. या पद्धतीत सरकार आणि शेतकऱ्यांमधील मध्यस्थ

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / ९