पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे बडोद्याशी नाते सांगतात हा योगायोग नव्हता. तर सयाजीरावांचे केलेले ते डोळस आणि बौद्धिक अनुकरण होते. याचा एक ठोस पुरावा म्हणजे १९६२ साली यशवंतराव चव्हाणांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. याला कारण होते पुढच्याच वर्षी म्हणजे १९६३ ला सयाजीरावांची जन्मशताब्दी होती. परंतु दरम्यान १९६२ चे भारत-चीन युद्ध सुरू झाल्याने यशवंतराव संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले. त्यामुळे हे काम मागे पडले. परंतु या निमित्ताने 'शिवाजी महाराज - सयाजीराव यशवंतराव' हा अनुबंध मात्र अधोरेखित झाला.
 पुण्यातील १२ मावळांत लहानपण गेलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वसमावेशकता ही लहानपणी विविध जातींच्या सवंगड्यांबरोबर निर्माण झालेल्या नात्याचा परिपाक होता. तर सयाजीरावांचे बालपण कवळाण्यासारख्या खेड्यात सामान्य आणि सर्व जातीतील बालमित्रांमध्ये गेल्याने त्यांच्या सर्वसमावेशकतेचे मूळ येथे आढळते. पुढे आयुष्यभर जगप्रवासातून कमावलेली तुलनात्मक दृष्टी, धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा तुलनात्मक व्यासंग याच्या जोरावर या सर्वसमावेशकतेचा परमोच्च विकास सयाजीरावांनी साधला.

 मावळ्यांच्या साथीने आयुष्यभराच्या संघर्षातून उभा केलेल्या स्वराज्याला शिवाजी महाराज खाजगी मालमत्ता न समजता नेहमी 'रयतेचे राज्य' असे संबोधत.शिवाजी 'महाराजांमधील '

महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते / ७