पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
'शिवसृष्टी'चे निर्माते



 मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नायक शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सुराज्य साकारण्याचा संकल्प महाराष्ट्राने सोडला होता. परंतु १७ व्या शतकातील शिवाजी महाराजांचे सुराज्य २० व्या शतकात साकारण्याचे प्रारूप मात्र १९ व्या शतकात सयाजीरावांनी बडोद्यात तयार केले होते. त्यामुळे हे सुराज्य सयाजीरावांमार्फत यशवंतरावांकडे आले होते. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी १९ नोव्हेंबर १९६० रोजी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच स्थापना होय.

 अशा प्रकारचे मंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य होते. या मंडळाची ध्येय आणि उद्दिष्टे हे थेटपणे सयाजीराव महाराजांनी या क्षेत्रात केलेल्या कामाचे अनुकरण होते. या निर्णयाबरोबरच महाराष्ट्रात सुरू झालेले अनेक उपक्रम

महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते / ६