पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरू केले. भारतीय राज्यघटनेने ज्या १७ भाषांना राज्य भाषांचा दर्जा दिला आहे त्या सर्व भाषांमध्ये ग्रंथनिर्मितीचा प्रयत्न करून एकप्रकारे शिवराय आणि सयाजीराव यांच्या धोरणाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला.

शिवराय – सयाजीराव – यशवंतराव

 महाराष्ट्रात शिवरायांनंतर त्यांचा वारसा थेट राजर्षि शाहूंशी जोडला जातो. हा वारसा जोडत असताना आपण आपलाचा इतिहास खंडित करत आहोत याचे भान राहत नाही. परंतु आपण शिवराय आणि सयाजीराव यांच्या धोरण आणि कृतीचा जेव्हा आपण जोडून विचार करतो तेव्हा आश्चर्यकारकरीत्या त्यामध्ये कमालीचे साम्य आढळते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र ‘प्रतिशिवाजी’ म्हणत असे. परंतु शिवाजी महाराजांचे विचार आणि धोरण बडोदामार्गे यशवंतरावांपर्यंत पोहोचले होते. जसे शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब सयाजीरावांमध्ये स्पष्टपणे दिसते तसेच सयाजीरावांचे प्रतिबिंब यशवंतरावांच्या सर्व विचार आणि धोरणांमध्ये पावलोपावली आढळते. मग ते सत्तेचे विकें द्रीकरण असो, कसेल त्याची जमीनअसो, मोफत शिक्षणाचे धोरण असो, गाव तेथे ग्रंथालय, साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती किंवा धर्मविषयक धोरण आणि कृती या

सर्व बाबी सयाजीरावांकडून आल्या होत्या असे म्हणण्यासाठी

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते / २५