पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदेश दिवाणांना दिले होते. त्याचबरोबर सर्व संस्कृतीतील पाककलांचा परिचय करून देणारे १० ग्रंथ सयाजीरावांनी प्रकाशित के ले होते.

राजव्यवहार कोश
 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रशासकीय सोयीसाठी राजव्यवहार कोश तयार करून घेतला होता हे आपण जाणतोच. सयाजीराव महाराजांनी इग्रं जी, मराठी, गुजराथी, संस्कृत , उर्दू, पारशी, हिंदी आणि बंगाली या ८ भाषांतील ‘श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू’ हा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. १९३३ मध्ये पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ७२ संस्थातफ्रे सयाजीराव महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगीच्या भाषणात सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दल बोलताना न.चिं. के ळकर म्हणाले, “नुकताच अनेक प्रांतीय भाषांचा उपयोग करून, थोरल्या शिवछत्रपतींचे अनुकरण करून सयाजीराव महाराजांनी एक प्रकारचा नवा राज्यव्यवहार कोशच निर्माण के ला आहे. त्यावरून त्यांचे भाषांविषयीचे निःपक्षपातीत्व दिसनू येते.” के ळकरांचे सयाजीरावांच्या राज्यव्यवहार कोशाबद्दलचे भाष्य महत्त्वाचे आहे. कारण शिवाजी महाराजानंतर असे काम करणारे ते एकमेव प्रशासक आहेत. भारताने आपल्या बहुभाषिक समाज, संस्कृतीला न्याय देण्याच्या भूमिके तून साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यासारख्या संस्थाच्या माध्यमातून

भारत सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात असे प्रयत्न

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते / २४