Jump to content

पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २० मार्च १९३३ रोजी पुण्यात मराठा समाजाच्या वतीने सयाजीरावांना मानपत्र देण्यात आले. या मानपत्रास उत्तर देताना के लेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, “कोणत्याही एकाच जातीस उत्तेजन देणे के व्हाही श्रेयस्कर होणार नाही. राष्ट्र व जात यांच्यामधील सबं ंध हात आणि बोटे यांच्याप्रमाणे आहे. ... ज्या जाती मागास आहेत त्यांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. मात्र या बाबतीत proportion म्हणजे प्रमाण पाहिले पाहिजे. ज्या प्रमाणात एखादी जात मागासली असेल तेवढ्याच प्रमाणात तिला उत्तेजन द्यावे. तसे करणे न्याय्य ठरेल.” सयाजीरावांची ही भूमिका पुन्हा एकदा आपल्याला शिवाजी महाराजांच्या सर्व समावेशक धोरणाची आठवण करून देते.

शाक्त सप्रं दाय
 शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाची महाराष्ट्र अभिमानाने दखल घेतो. परंतु १४ सप्टें बर १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी के लेला शाक्त (दुसरा) राज्याभिषेक जो शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात क्रांतिकारक टप्पा होता असे कॉ. शरद पाटील म्हणतात तो मात्र सश ोधकांच्या आणि अभ्यासकांच्या दृष्टीने एक ‘अडगळीतील’ विषय ठरला आहे. कॉ. पाटलांच्या या सदं र्भातील सश ोधनाचा निष्कर्ष फारच क्रांतिकारक आहे. कारण शाक्त पंथ हा जातीय आणि स्त्री-पुरुष विषमता नाकारणारा समतावादी पंथ होता. या पंथाचा सर्वात

महत्त्वाचा उत्सव हा घटस्थापनेचा होता.

महाराजा सयाजीराव ‘शिवसृष्टी ’चे निर्माते / २०