पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुसरा सदं र्भ म्हणजे महाराजांची कन्या इदिरादेवी यांनी त्यांचा सयाजीरावांनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदेंशी ठरवलेला विवाह स्वतःहून मोडून बंगाल प्रांतातील कुचबिहार ससं ्थानचे आदिवासी राजे जितेंद्र नारायण यांच्याशी के लेला मराठा-आदिवासी विवाह होय. शाहू महाराजांना धनगर-मराठा विवाहाची प्रेरणा देणारा हा विवाह सयाजीरावांच्या मनाविरुद्ध झाला असला तरी ते मुलीच्या या निर्णयात ठामपणे तिच्याबरोबर उभे राहिले. स्त्रियांना कौटुंबिक सन्मान आणि आर्थिक स्वायत्तता प्रदान करण्यासाठी सयाजीरावांनी कायदेशीर प्रयत्न के ले. १९३३ मध्ये बडोद्यात लागू झालेल्या हिंदू स्त्रियांचा सपं त्तीतील हक्क कायद्यामध्ये हिंदू महिलांना वारसा हक्काने कौटुंबिक सपं त्तीत हिस्सा देण्यात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे बडोदा हे भारतातील पहिले ससं ्थान आहे. भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासात हिंदू कोड बिलाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय राज्यघटनेत हिंदू कोड बिलाची चर्चा सरूहोण्याआधी ४५ वर्षे म्हणजे १९०५ पासनू हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी बडोद्यात सरूझाली होती. हिंदू कोड बिलात समाविष्ट असणाऱ्या ६ घटकांशी सबं ंधित सर्व कायदे सयाजीरावांनी १९०५ ते १९३३

या काळात लागू के ले होते.

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते /१९