Jump to content

पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घटस्थापनेचा उत्सव हा कृषी ससं ्कृ ती आणि स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. आद्य स्त्रीसत्ताक राणी निर्ऋ तीची कन्या दुर्गेच्या जागराचा हा उत्सव शाक्त पंथात सर्वात महत्त्वाचा मनाला जातो. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक प्रस्थापित इतिहास म्हणतो त्याप्रमाणे अंधश्रद्धेतून के ला होता हे म्हणणे सहज खोडून काढणारे वरील सदं र्भ विचारात घेता जाती अंताच्या क्रांतीतील हा एक अत्यंत निर्णायक टप्पा होता.हा राज्याभिषेक आणि सभ ाजी महाराजांची ससं ्कृ त तज्ज्ञता यांचा थेट सबंध होता. कॉ. शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे दुसऱ्या राज्याभिषेकाचा सल्ला सभ ाजी महाराजांनी दिला होता. कारण सभ ाजी महाराजांनी समतावादी शाक्त धर्माच्या प्रस्थापनेचा आरंभ के ला होता. त्यांनी आपल्या पत्नीला ‘श्री सखी राज्ञी जयति!’ या शिक्यासह राज्यकारभार करण्याचे अधिकार दिले होते. भारतीय राजवंश परंपरा विचारात घेता या परंपरेत स्त्रीला असे अधिकार दिल्याचे उदाहरण सापडत नाही.
 अस्पृश्यांना ब्राह्मण पुरोहिताचे अधिकार बहाल करणे, पुरोहितांना परीक्षा घेऊन धार्मिक विधीचा परवाना देणारा कायदा, क्रांतिकारक हिंदू कोड बिल तयार करून स्त्री-पुरुष विषमता नष्ट करणारा निर्णय हे सर्व शिवाजी महाराजांच्या धर्म आणि जातविषयक धोरणाचे कालससगं त विकसित रूपच होते. या जोडीला शिवाजी महाराजांची शाक्त परंपरा

अजाणतेपणी सयाजीरावांनी बडोद्यात जपली होती. शाक्त

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते /२१