स्त्री-सन्मानाचे धोरण
स्त्रियांशी दुर्वर्तन के ल्यानंतर शिवाजी महाराजांनी रांझे गावचा
पाटील व बेलवाडीचा किल्लेदार सख ोजी गायकवाड यांना
के लेली शिक्षा आपण जाणतोच. ‘पर स्त्री मातेसमान’ मानणाऱ्या
शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सन्मानजनक आयुष्य जगण्याची
सधी उपलब्ध करून देण्याचा के लेला प्रयत्न हा भारतातील
स्त्रीमुक्तीचा महत्त्वपूर्ण टप्पा होता. शिवाजी महाराजांच्या
धोरणाचा वैज्ञानिक विकास करत सयाजीरावांनी स्त्रियांच्या
सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न के ले. या सदं र्भात महाराजांच्या
वैयक्तिक जीवनातील कृतिशीलता अधोरेखित करणारे दोन
सदं र्भ विचारात घ्यावे लागतात. पहिला सदं र्भ म्हणजे महाराणी
चिमणाबाई (दुसऱ्या). महाराणी बडोद्यात आल्या तेव्हा निरक्षर
होत्या. त्यानंतर सयाजीरावांनी त्यांना शिक्षण दिले,२४ वर्षाच्या
आपल्या जगप्रवासात सतत बरोबर ठे वले.महाराजांच्या या
प्रागतिक धोरणाचा परिणाम म्हणून महाराणी चिमणाबाईनी
१९११ मध्ये ‘The Position of Women In Indian Life’
हा ग्रंथ लिहिला. तो लंडनमधून प्रसिद्ध झाला. आधुनिक
भारतातील एखाद्या राणीने लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता.
या ग्रंथाचे वेगळे पण म्हणजे जगातील सर्व खंडातील स्त्रियांच्या
दर्जाचे प्रत्यक्ष अवलोकन करून तुलनात्मक पद्धतीने लिहिलेला
हा जगातील आज अखेरचा एकमेव ग्रंथ आहे.