पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहत असण्याची माहिती ठे वण्याची योजना या कायद्यात करण्यात आल्यामुळे जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घातलागेला. आधुनिक भारतातील अशा प्रकारचा हा पहिला कायदा होता. जबरदस्तीने महंमद कुलीखान बनलेल्या सेनापती नेताजी पालकरांचे आणि बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर घडवून आणत शिवाजी महाराजांनी सरूके लेल्या स्वधर्म रक्षणाचा सहिष्णू कार्यक्रम सयाजीरावांनी या कायद्याच्या माध्यमातून विकसित के ला. हा कायदा करत असताना हिंदू धर्माचा अतिरेकी अभिमान यामागे नव्हता तर देशी धर्म आणि ससं ्कृ तीतील स्वत्त्व जपण्याचा तो एक आधुनिक प्रयत्न होता.
 सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा फुलेंना १८८९ मध्ये त्यांच्या आजारपणात व त्यांच्या पश्चात सावित्रीबाईना आर्थिक मदत के ली. स्वातंत्र्य चळवळीच्या कार्याला मदत म्हणून सयाजीरावांनी हिंदुत्ववादी टिळकांना पुण्यातील स्वमालकीचा गायकवाड वाडा कागदोपत्री व्यवहार दाखवून भेट दिला. परंतु गीता रहस्य ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यातील जातिव्यवस्थेबाबतच्या टिळकांच्या मागासलेल्या धोरणांवर थेट आणि परखडपणे टीका करायलाही ते विसरले नाहीत. १९३० मध्ये सयाजीरावांनी हिंदू महासभेच्या डॉ. मुंजेंना अस्पृश्योद्धाराच्या कार्यासाठी १२,००० रु.ची मदत के ली. प्रत्येक विचारसरणीच्या व्यक्तींना त्यांच्या कार्याचा हेतू लक्षात घेऊन मदत करण्याचे सयाजीरावांचे धोरण म्हणजे शिवाजी

महाराजांच्या सर्वसमावेशकतेची ‘प्रगत’ आवत्ती होती.

महाराजा सयाजी७राव ‘शिवसष्टी'चे निर्माते / १७