पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमचा संबंधनवा नाही, तो जुनाच आहे. राजकीय सबंधप्रमाणेच आमचे शारीरिक सबंध झाले आहेत, असे इतिहासावरून तुम्हास आढळून येईल. या इतिहासाचा पोकळ अभिमान धरण्यात हशील नाही. त्याचे निःपक्षपाती बुद्धीने निरीक्षण करून त्यापासनू जरूर तो बोध आपण घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचा सन १६६० ते ६५ च्या सुमारास राज्याभिषेक सोहळा झाला. तारखेत कदाचित चूक असेल, कारण मी अंदाजाने बोलत आहे व सन १८१८ त पेशवाई बरोबर मराठ्यांचे राज्य बुडाले, म्हणजे मराठी राष्ट्र अवघे १५०-२०० वर्षच टिकले. हा काळ इतिहासात किती अल्प आहे? मनुष्याप्रमाणे राष्ट्रालाही कार्य करण्यास इतिहासात ‘काल आणि स्थल’ (Time and Space) यांची जरूरी असते. या दोन्ही गोष्टी दुर्दैवेकरून मराठी राज्यास मिळाल्या नाहीत. ज्या राष्ट्राला आपले सामर्थ्य व सत्ता १५०-२०० वर्षे ही नीट टिकविता आली नाही, त्यास जगाच्या इतिहासांत राष्ट्र म्हणून कोणते स्थान मिळे ल? मराठी सत्तेचे स्मारक म्हणून आज एक तरी चांगली इमारत किंवा राज्य पद्धतीचे एखादे वैशिष्ट्य आपणास दाखविता येण्यासारखे आहे काय? तेव्हा असल्या अल्पजीवी राष्ट्राबद्दल पोकळ अभिमान धरण्यापेक्षा ते इतक्या लवकर व थोड्या काळात का नाहीसे झाले याचा तुम्हास उपयोग होईल.” शिवाजी महाराजांचे साम्राज्य अल्पजीवी का ठरले या प्रश्नाची ८८ वर्षापूर्वी सयाजीरावांनी के लेली चर्चा मराठ्यांच्या एकाही

इतिहासकाराने आजवर के लेली नाही. सयाजीरावांच्या या

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / १४