Jump to content

पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंतनात राज्य कसे करायचे आणि राज्य कसे करायचे नाही या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत.

सर्वसमावेशक राज्यकारभार
 सयाजीरावांनी राज्यकारभाराच्या अगदी सरुुवातीपासनू च शिवाजी महाराजांचा आदर्श शतप्रतिशत अवलंबला होता हे यावरून स्पष्ट होते. म्हणूनच चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणतात, “हिंदुस्थानात आतापर्यंत दोनच खरे राजे झाले आहेत, ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव महाराज.” शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्य सयाजीरावांनी बडोद्यात प्रस्थापित के ले. त्यामुळे सयाजीराव हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य धोरणाचे खऱ्या अर्थाने पहिले निर्माते होते. त्यामुळेचपंडित मदन मोहन मालवीय यांचे ‘महाराजा सयाजीराव हे हिंदुस्थानातील शिवाजीनंतरचे शेवटचे आदर्श राजे होत.’ हे विधान सयाजीरावांचे सर्वात योग्य मूल्यमापन ठरते.
 शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्यात सर्व जातीधर्मीयांना सामावून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न के ला. शिवाजी महाराजांचे सैन्य मुख्यतः कुणबी, सुतार, वाणी व हीन जाती यांनी बनले असल्याचे निरीक्षण प्रवासी अली इब्राहीम खान यांनी त्यांच्या ‘तारीख–ए-इब्राहीम खान’ या ग्रंथात नोंदवले आहे.लष्करी अधिकारीपदी मराठा, मुलकी प्रशासनात ब्राम्हण व प्रभू आणि आरमारामध्ये कोळी व भंडारी या जातीच्या लोकांचा

समावेश करून शिवाजी महाराजांनी प्रशासकीय पातळीवर

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्ृ टी’चे निर्माते / १५