पान:महाभारत.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ ४५ ॥ जैसा हलधर भिडिपाळ । उडवी भोरैडीयांचे पॅाळ । तैसे अभिमन्यु सैन्यमेळे । वरच्या वरी वारिले. ॥ ४६॥ कुरुवर्य राजशिखामणी । भद्र सैन्याचे निजमंडणीं । दुर्योधनाचे पुत्र वंशाभरणी । कुळदीपक जन्मले. ॥ ४७ ।। लक्ष्मण लक्षणे सुलक्षण । तया क्षणे ईक्षण तीक्ष्ण । शिक्षण विलक्षण, प्रताप घन । पाहोनी क्रोधे धडाडी. ॥ ४८ ॥ श्रीमान्य, तनुकोमळ, रुचिर, । जाणों सदृश नंळकूबर । प्रभिन्नचाप सज्जोनी शर । सौभद्रातें थडकला. ॥ ४९ ॥ रुक्मस्पंदन, सुवर्ण ध्वज, । कीळ फांकती अरुणतेज । कृतांतकाळीं आयुष्यकाज । वर्षोंनियां वोढिला. ॥ ५० ॥ रुक्मपुंखी अवक्र शर । शिंळाशित तीक्ष्ण घोर । सोडुनी ताडिला उत्तरावर । बाहीं उरी प्रतापें. ॥ ५१ ॥ येरें न गणोनी तया बाणा । हास्य करूनी म्हणे, ‘रणा । किमर्थ आलासी ? नृपनंदना ! । कुरुमंडण वंशाचे. ॥ ५२ ॥ तुझिया तातें। अपराध घन । करुनी, क्षत्रियां आणिलें मरण । आतां होउनी सावधान । रक्षीं तनू आपुली. ॥ ५३ ॥ सर्वांदेखतां येची क्षणीं । तूतें वोपीन काळसदनी'. । ऐसे वदोनी कुंलिशमानी । शितीं शर सज्जिले. ॥ ५४॥ आकर्णातें वोटोनी रोपें । सोडिला, पिटोनी घोरघोष । सुसाट उतरला चंडांश' । धरा तेजें डळमळी. ॥ ५५ ॥ ‘आहा !' शब्द कौरवमेळीं । येवोनी बैसला कंठनाळीं । शिर उडविलें अंतराळीं । मुगुटकुंडलें साजिरीं. ॥ ५६ ॥ दुर्योधन पिटोन हृदय । “कुळदीप विझाला, म्हणे ‘सूर्य । आतां काय जीवित्वसोय ?' । म्हणोनी रणा लोटला. ॥ ५७ ॥ पाठी धांवल्या वीरांच्या कोटी । शस्त्रे अस्त्रे निबिड मुष्टी । धनुर्धरांमाजी जगजेठी । षड् रथी तगटले. ॥ ५८ ॥ त्यांची नामें म्हणसी कोण । द्रोण, द्रौणी, तिसरा कर्ण । कृप, कृतवर्मा, यादव जाण, । बृहद्बळ साहावा. ॥ ५९ ॥ सर्वात्रभेदी [शरमाळा] । शतशः वीरांतें भेदिती हेळ । क्रोधे वमोनी अग्निज्वाळा । सौभद्रातें धडकले. ॥ ६० ॥ वर्षोंनियां बाणसमूहो । बुजोनी काढिला उत्तरानाहो । येरू न पावतां मोहो। विन्मुख केलें सवते. ॥ ६१ ॥ गजानीका मिळोनी बळी । केली तयांची रवर्दळी । पार्थतनय अतुर्बळी । शतशः दळी लोटले. ॥ ६२ ॥ निकड । १. नांग-या, शेतकरी. हल=नांगर, २. गोंफण, दगड मारण्याचे एक प्रकारचे दोरीचें शिके. ३. चिमण्यांचे समूह. ४. मेळ—समुदाय. ५. कुबेरपुत्र. ६. किरण किंवा ज्वाळा. ७. सहाणेवर पाजवलेला. ८. वज्रासारखे. ९. धनुष्याचे दोरीचे ठायीं, गुणीं. १०. सोसाट्याने, वेगानें, ११. जणू काय सूर्यच उतरला, असे वाटलें-हा इत्यर्थ. १२. सहज, लीलेने. १३. आच्छादून, झांकून. १४. उत्तरेचा पति, अभिमन्यु, १५. नाश, चकाचूर.