पान:महाभारत.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ अध्याय महाभारत. ८३ करुनी अस्त्रघायीं । देव्हडा मारा केला तिहीं । येरें धनु कर्षांनी बाहीं । प्रदीप्त भाली सोडिल्या. ॥ ६३ ॥ पाद, पाणी, भुजा सरळा, । चीर, मौळे, मुगुट, माळा, । छेदुनी पाडिलें धरातळा । स्यंदनध्वजासहित. ॥ ६४ ॥ जैसा कुठार पादपशाखा । ढेसोनी करी निर्मूळ रुखा । तैसे सौभद्रे, नरनायका ! क्रोधे पुत्रा मर्दिलें. ॥ ६५ ॥ हलकल्लोळ सेनामेळीं । ‘पळा पळा' म्हणती सकळीं । क्षत्रियबीज धरणीतळीं । कांहीं तरी वाचवा.' ६६ ॥ ऐसी वीरांची उत्तरें । ऐकोनी घडूथी क्रोधभरें । लोटले सौभद्रासामोरे । जेवीं पॅड्वैरी प्राणिया. ॥ ६७ ।। तालप्रमाण विशाळ चापें । प्रदीप्तबाणी विषाचे रोपे । वर्षते जाहले महातापें । अभिमन्याते निघालें. ॥ ६८ ॥ पंचशत बाण तीव्रधारा। द्रोण समर्प रोखें वीरा । बृहद्वळ द्विशत शरां । ताडी सौभद्रा आक्रोशें. ॥ ६९ ॥ कृतवर्मा यादवपती । ऐशी बाण समप काळघाती । शारद्वत सात शर निगुती । महा त्राणे समर्प. ॥ ७० ॥ शिळाशित सुवर्णपुखी । कर्णे विधिले मैहातवकीं । अश्वत्थामा फैणींद्रमुखी । दाहा अर्षी प्रतापें. ॥ ७१ ॥ वारोनी सर्वांची शरवृष्टी । कर्ण विधिला कर्णपुटीं । कृपाचार्या ताडुनी निहँट । स्तनांतरीं अर्पिले. ॥ ७२ ॥ त्वरा करूनी शरसंधानीं । पृष्ठीं सारथी पाडिला रणीं । दश नाराचं हेमवर्णी । स्तनांतरी अर्पिले. ॥ ७३ ॥ अश्वत्थामा प्रतापराशी । पंचवीस शर विधिले त्यासी । येरें न गणोनी साक्षेपेंसी । सौभद्रातें ताडिलें. ॥ ७४ ॥ अकंपित कष्र्णी महाहवा । तीन बाण अर्पिले सर्वां । क्रोधे संतप्त द्रौणी तेव्हां । सासष्ट शर समप. ॥ ७५ ॥ अभिमन्यु वीर क्रोधानळीं । त्रिसप्त हेमपंखी भाली । अश्वत्थामा ताडिला बळी । द्रोण रोखें धडाडी. ॥ ७६ ॥ सरसावोनी द्रौणी तया । त्रिसप्त नाराच अपत या । शत बाण प्रभिन्न द्रोणाचार्या । ताडी निघातें पांडव्य. ॥ ७७ ॥ चाळीस विधिले वैकर्तने । वीस कृतवर्मा ज्वलीन । बृहद्वळ दामिनीमैन । शर पंच्याऐशीं समर्पो. ॥ ७८ ।। अंवक्र शर शिळाशित । दाहा विधी शारद्वत । ‘मौरिलासी, म्हणोनी हर्षयुक्त । सिंहनाद फोडिला. ॥ ७९ ॥ | १. देव्हडा=देहुडा=शरसंधान करण्याचे वेळी उभे राहण्याचा एक प्रकार; एका पायावर भार घेऊन उभे राहून दुसन्या पायाचे पाऊल उचलून त्या पायावर टेकिलें असतां जो पाय वक्र होतो तो. २. वृक्षास, झाडास. ३. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर व दंभ हे प्राण्याचे सहा शत्र. ४ बाण. ५. मोठ्या आवेशाने. ६. ज्याचें पातें सर्पाच्या आकारासारखे होते, असे बाण, ७. जोराने. ८. सपाट्याने. ९. सौभद्र. १०. पांडवपुत्र (अभिमन्यु). ११. विजेप्रमाणे. १२, सरळ, १३. मारिलासी=मारिला गेलास, ठार झालास.