पान:महाभारत.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ८१ ११ अध्याय) अभिमन्यु म्हणे, ‘रे ! पापिष्ठा ! । श्लाघ्य बोलसी रणचोहटा । मी पातलों मृत्यूच्या वाटा । तुम्हां सर्व न्यावया. ॥ २८ ॥ आतां होईजे सावधान'. । म्हणोनी सूदले बाण । वोढे काढुनी आकर्ण । वातवेगें सोडिले. ॥ २९ ॥ सुसाट उतरूनी गगनीं। तीन भेदिले हृदयभुवनीं । तीन तीन प्रैभिन्न बाणीं । उभय बाहू भेदिले. ॥ ३० ॥ पुन्हा सोडुनी तीव्र शर। सहभुज उडविलें शिर।। मद्रेशदळीं ‘हाहाकार । शत राजपुत्र लोटले. ॥ ३१ ॥ बाण सोडुनी काळानळी । सौभद्र बुजिला तयातळीं । दुर्योधन पिटोनी टाळी । ध्या, घ्या, चिरा; म्हणतसे. ॥ ३२ ॥ गाढा आर्जुनी धनुर्वाडा । बाण कर्पोनी झडझडा । शरें शराचा भंगोनी वेढा । राजपुत्र ताडिले. ॥ ३३ ॥ येरी वमोनी क्रोधउल्का । गंधर्वास्त्र सोडिलें देखा । मोडीत वीर अनेक भेका। गंधर्वमाया निर्मिल्या ॥३४॥ अभिमन्यु वीरचूडामणी । सर्वास्त्रभेदी कुलिशपाणी। तंबरास्त्र प्रेरुनी झणी । गंधर्वमाया दवडिल्या. ॥ ३५ ॥ अस्त्रप्रयोग करूनी त्वरा । बाण सोडिले क्षुरप्रेधारा । शत राजपुत्र भेदुनी सैरा । शिरें व्योमा उडविली. ॥ ३६ ॥ जैसे कंदुक देंशावतारीं । खेळती, झेलती हस्तकुसरी । तैसीं शिरें उसळोनी वरी । झणी येती तळांत. ॥ ३७ ॥ अभिमन्यु पेटुनी महामारीं । गजाश्वपति पडिल्या हारी । शवे दाटली वसुधा पैरी । रिक्त ठाव असेना. ॥ ३८ ॥ हस्तविरहित पादहीन । शिररहित वपु पूर्ण । खंडविखंड छिन्नभिन्न । नाना कैलेवरें दाटली. ॥ ३९ ॥ जिकडे तिकडे हाहाकार । माघारले सेनाभार । दुर्योधन उभय थोर । म्हणे, ‘धन्य पुरुषार्थी. ॥ ४० ॥ एकांग वीर समान इंद्र । बळप्रताप सम रुद्र । पार्थाहुनी विद्यासमुद्र । अक्षोभता नेणवे. ॥ ४१ ॥ ऐसें वदोनी, नरनायक । जाला सौभद्रासन्मुख । द्रोणद्रौणिकर्णादिक । भूप सौबळभोजादी. ॥ ४२ ॥ सवें चतुरंग सेनाभार। उसळे जैसा मकराकार । शस्त्रसंपात सोडिती क्रूर । आस्फोटिती शब्दाते. ॥ ४३ ॥ वासवपौत्र वासवासम । रणरंगधीर अचळ नेम । शर वर्षेनी राजसत्तम । वीर वीर त्रासिले. ।। ४४ ॥ बाणामागे बाण सुटी । कोण्हा न करवे वरती दिठी । वीरीं देवोनियां पाठी । अष्टदिशा निघाले --- -- ४. प्रळयाग्नीसारखे. ५. सुन्यांच्या धारेसारखे १. योग्य, स्तुत्य. २. ताण. ३. मोठ्या. (तीक्ष्ण). ६. दशावतारांत ह्मणजे नाटकांत किंवा लळितांत जे नाचाचे, कसरतीचे व हस्तकौशलाचे प्रकार होत, त्यांवर येथे कटाक्ष आहे. ७. पृथ्वीरूपी नगरी (पुरी); (किंवा) पुरी=पूर्णपणे. ८. प्रेते, शवें. ९. संपात=वर्षाव, मारा. १०. इंद्राचा नातू (अभिमन्यु). | १२ न० दो०