पान:महाभारत.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० नरहरिकृत [द्रोणपर्व अडचणी पंचानना । वेष्टोनी शस्त्र वर्षती नाना । सैन्य अभिमन्यु वीरराणा ।। घेवोनी त्राण ताडिती. ॥ १२ ॥ फरफराट धनुष्यघोपें । तळत्राणे स्फुरिती श्वास । खणखणाट शस्त्रमुखी विष । व्याळापरी सांडिती. ॥ १३ ॥ ‘हाणा हाणा' एकची ध्वनी । सर्वामुखीं ऐकिजे श्रवणीं । एक सांपडला आजुनी । जाबों नेदी सर्वथा. ॥ १४ ॥ रथीं वेढोनी कार्मुक सैरा । सोडिती सायक अग्निधारा । हैस्तिपीं पेलोनी गजभारा । विचित्र शस्त्रे वर्षती. ॥ १५ ॥ अश्ववार लोटोनी पदाती। विचित्र शस्त्रे फेंकिती शक्ती। अस्त्रमय जाले, व्योमपंथीं। रवी कांहीं दिसेना. ॥१६॥ देवीयुद्धीं रैंक्तबीज क्रूर । रणी दाटले जैसे असुर ।। | तैसे अनेक शस्त्रांचे संभार । सौभद्रावरी लोटले. ॥ १७ ॥ बाप अभिमन्यु वीर सुभट । धनुर्विद्यांचे विद्यापीठ । अत्र प्रयोग करुनी नीट । बाणकोटी सोडिल्या. ॥ १८ ॥ तटतटा शिरें खंडुनी पाहीं । सकुंडल मुगुट पडती मही। जाणों “गणे रिचवोनी देहीं । भूतळाते उतरली. ॥ १९॥ अनेक शत्र वीरपाणी । भूषित भूषणीं विचित्रवर्णी । खंडुनियां पिटिती अवनी । का ळदंडासारिखी. ॥ २० ॥ शाल्योदनीं पिशितअनें । काया वर्धली रुचिर घन । खंडविखंड होवोनी बाणे । शवे धरे दाटली. ॥ २१ ॥ अमोघ अ. गजांचे सैंपें । छिन्नगात्री पडिले अमोघ । रक्तनदीचे तुंबळ वोघ । खळखला लोटले. ॥ २२ ॥ रौद्ररण भयकर्कश । दारुण संग्राम वीरनाश । यमराज वधिलें, वीरां तोष । निघोनी गेला दिगंता. ॥ २३ ॥ खळबळोनी सैन्यश्रेणी । निघते जाले मागिले चरणीं । सत्यश्रव भूप काळमानी । सहित सेना लोटल्या | ॥ २४ ॥ रुक्मरथ मंद्रसेनतनय । जैसा अभिमानी सबळधैर्य । धडको म्हणती, आयुर्दाय । क्षत्रिया ! तुझा खंडला. ॥ २५ ॥ जैसा फैणिधामा पातला मूषक । की व्याघ्रधामा सारंगै देख । ना ते मगरीधामा शशक । पावतां जेवीं वांचिजे; ॥ २६ ॥ तयापरी नृपसत्तमा । एकटा पातलासी संग्रामा । आयुष्याची लोटली सीमा । वश काळा जालासी. ॥ २७ ॥ | १. सर्पाप्रमाणे. २. हस्तिप=माहूत. पेलणे सांभाळणे, ताब्यांत ठेवणे, आवरणे. ३. असर, विशेष. याने उग्र तप करून रुद्रास प्रसन्न केले, व ‘माझं रक्त जमिनीवर पडले असतां प्रत्येक | बिंदूंपासून माझ्यासारखे पराक्रमी राक्षस उत्पन्न व्हावे असा वर संपादन केला. ह्या वराच्या योगानें शुंभनिशुभवधकाळीं ह्याच्या रक्तापासून अनेक राक्षस निर्माण होऊ लागले, तेव्हा कालिकने विक्राळरूप धारण करून, ह्याचे रक्त जमिनीवर पडू न देता, याचा वध केला–अशी कथा आहे. (देवीभागवत-स्कंध ५ अध्याय २७-२९ पहा). ४. नक्षत्रे. ५. समुदाय. ६. यमासारखा, ७. शल्यपुत्र. ८. सापाच्या विळांत. ९. हरिण,