पान:महाभारत.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ ११ अध्याय] महाभारत, कुमारीं । लोटिला आम्हीं रणसागरीं । भूतसंचार मम अंतरीं । आज्ञापिलें लेंकरा. ॥ ११७ ॥ दुष्ट शत्रूची मांदोडी । माजी व्यूहाची परवडी । अभिमन्य धाडिला बुद्धी कुडी । जे असाध्य निर्जरां. ॥ ११८ ॥ धांवा, धांवा, वीर हो ! तोषा । जीवित्वाची न धरूनी आशा । विभांडूनी शत्रूच्या कोशा । साह्य सौभद्रा होइजे.' ॥ ११९ ॥ असो. पुढां युद्ध दारुण । फाल्गुनी क्षत्री प्रतापवान । कुरुवर्यराज लक्ष्मण । स्वर्गधामा वरील. ॥ १२० ॥ तो कथारस चतुरचतुरीं । प्राशन कीजे श्रवणद्वारीं । नरहरीमोरेश्वर वैखरी । वदे श्रीगुरु[भीजराज] प्रसादें. ॥ १२१ ॥ अध्याय अकरावा. संजय म्हणे, ‘धरत्रीनाथा !। पुसिल्या प्रश्नाची कथिली वार्ता । अभिमन्युयुद्धाची रौद्रता । सादर आतां ऐकिजे. ॥ १ ॥ जयद्रथ पांडवें विन्मुख । करितां आल्हाद वीरां देख । बैंरवाळोनी भूप सतिखें । अभिमन्याते लोटले. ॥ २ ॥ गजाश्वरथीपदाती । महात्राणे मिनले घातीं । जाणों उसळला अपांपती । क्षयालागीं ज्यापरी. ।। ३ ।। वेष्टोनी सौभद्र, शस्त्रवृष्टी । करिती रोपें निबिड दाटी । पार्थसुत प्रतापजगजेठी । वीर मल धनुर्वाडा. ॥ ४ ॥ शर वर्षेनी कडाडी । सेना सकळ देशेधडी । करितां, वृषसेनें तडाडी । स्यंदन पुढां लोटला. ॥ ५ ॥ बळी मत्स्यप्राय समुद्रोदरीं । उसळला वीर क्रोधलहरी । शर वर्षांनी अॅशनीसरी । बुजोनी कोष्र्णी काढिला. ॥ ६ ॥ अकंपित सौभद्र शेष किरणी । बाण सोडिले सम अग्नी । चाप खंडुनी सारथी गुणी । यमसदना धाडिले. ।। ७ ।। त्वरा करूनी महारवें । अश्व ताडिले शरलाघवें । पोळतां उसळोनियां 'हवें । रथासहित पळाले. ।। ८ ।। अरी वसाती राजेश्वर । धांबोनी विधिले साठी शर । रुक्मपुंखी ज्वलीनधार। सौभद्रअंगीं रुतले. ॥९॥ आर्जुनी वीर वीरराय । शर सोडुनी भेदिलें हृदय । भूमीं पाडिले पाँदपप्राय । जेवीं वायु स्पर्शतां. ॥ १० ॥ दुःसह मानोनी कौरववीरीं । लोटले मुखासहित हारी । वर्षांनी शरांच्या तीव्र धारी । प्रळयमेघासारख्या. ॥ ११ ॥ जैसा । १. दुर्धर मान्यांत, शत्रच्या भयंकर दणक्यांत. २. समुदाय. ३. कोश=कोट, गोट, आवरण, वेष्टन (व्यूह). ४. वाणी. येथे मूलांतील त्रेचाळिसावा अध्याय संपतो. ५. उग्रता, प्रखरता. ६. वरवाळणे-चढाई करणे. ७. पराक्रमी. (तिख=तीव्र, तीक्ष्ण), ८. समुद्र. ९. पिटाल (पळवून) लाविल्या असतां. १०. आकाशातूने तुटून पडणा-या तारांप्रमाणे (भराभर व वेगा ११. अभिमन्यू. १२. स्थिर, भयरहित. १३. सिंहनाद फोडून. १४. त्वेषाने. १५. सोया पिसारे ज्यांना आहेत असे. १६. वृक्षांसारिखे.