पान:महाभारत.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ नरहरिकृत [द्रोणपर्व गिरिगिरी । पावतां, धैर्य आफळी. ॥ ९७ ॥ अग्निवर्चस साठ बाण । धृष्टघुम्ना अर्पिले घन । सर्वांग भरिलें रुधिर, तेणें । दाहा वीरां विधिलें. ॥९८॥ द्रुपदराज पांचाळपती । पांच अप काळघाती । सप्त नाराच अग्निकांती ।। शिखंडीने ताडिले. ।। ९९ ॥ कैकेयराया अतिकर्कश । शर अर्पिले पंचवीस । द्रौपदीनंदने फणिविष । तीन तीन विधिले. ॥ १०० ॥ कुरुवर्यराज युधिष्ठिर । ताडिले बाण सत्याहत्तर । हर्ष पावोनियां थोर । सिंहनाद फोडिला. ॥ १०१ । धर्म चतुर चतुरावर्ती । “धनुष्य' खंडुनी पाडिलें क्षिती । मंद हास्य करुनी नृपती । “सावध' म्हणे शालका. ॥ १०२ ॥ येरें न लगतां अर्ध क्षण । अन्य कार्मुक सज्जिलें क्षणे । दक्ष सायक अतितीक्ष्ण । अर्पून तीन ‘विधिले. ॥ १०३ ।। हस्तलाघव पाहोनी दृष्टी । भीमा कोप नावरे पोटीं । चाप कर्पूनियां मुष्टी । बाण नव सोडिले. ॥ १०४ ॥ ध्वजछत्र धनुष्य निगुती । छेदुनी पाडिले धरेप्रती । रोघे संतप्त सैंधवनृपती । अन्य कार्मुक वाहिलें. ॥ १०५ ॥ आकर्ण वोढूनियां जाण । शर सोडिले प्रभिन्न घन । धारामुखीं डळमळी अग्न । हेमपिसारे साजिरे. ॥ १०६ । वारितां आदळले रथाप्रती । अश्व छेदुनी पाडिले क्षिती । प्रभिन्न चाप रुक्मकांती । मष्टीपा. साव छेदिले. ॥ १०७ ॥ रत्नमंडित विशाळ केतू । शोभायमान झळझळित । शिरा दावोनी गगनपंथू । धरातळी पाडिली. ॥ १०८ ॥ भ्रष्ट करुनी रथोतम । मही आणिला यार्दैव, भीम । अद्भुत देखोनी रौद्रकर्म । वीर माना डोलविती. ।। १०९ ।। शूरकेसरी महावीर । छिनधन्वा पडिला स्थिर । भपमांदी खळबळी थोर । किलकिलाट माजला. ॥ ११० ॥ जयद्रथराजा रणांगणीं । विचरे जैसा पाशपाणी । शर वर्षांनी प्रदीप्तकिरणी । वीरवीर त्रासिले. ॥ १११ ॥ वाजि, वारण, पदाती, रथी । छिन्नगात्री विगतगती । पलायमान सांवर चित्तीं । वीरां कोणा न धरवे. ॥ ११२ ॥ जैसी पंचवटीं रामचापरेखा । उल्लंघन न होय दशमुखा । ना ते दावानळप्रदीप्तशिखा । उलंघवेना ज्यापरी. ॥ ११३ ॥ तयापरी व्यूहाच्या द्वारा । प्रवेश नव्हे पांडववीरा ।। माघारले पृतनाभारा। उपाय कांहीं न चाले. ॥ ११४ ॥ सात्यकिभीमादि धृष्टद्युम्न । घटोत्कच आणि माद्रीनंदन । विगतमानसे फिरती जाण । [अपेश ओझे वाहुनी.] ॥ ११५।। कासावीस कुरुनंदन । म्हणे, ‘विचार करणे कोण ?।। देखदेखतां काळाग्नीं जाण । बाळक कैसे वोपिलें ? ॥ ११६ ॥ सकुमार कुमार १. भोंवळ, चक्कर. २. अग्नीसारखे तेजस्वी. ३. मेव्हण्यास (जयद्रथास). ४. सात्यकी. ५. धैर्य.