पान:महाभारत.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ नरहरिकृत [द्रोणपर्व हस्ती चित्रिले वदनीं । घंठा घागच्या चामरें किरणीं। इंद्रगोप पाखरा वर्णी । हिणाविती बालार्का. ॥ ६२ ॥ सहित युद्धी माहावंत । खचोनी धरे पाडिले प्रेत । पदाति वीर असंख्यातः । वस्त्राभरणीं पडियेले. ॥ ६३ ॥ नाना द्वीपींचीं अश्वरत्ने । जाणों चित्रींची जीवैविलीं यत्ने । छेदोनी पाडिली अप्रयत्न । कृतांतसरी; नरेंद्रा ! ॥ ६४ ॥ सैन्य भोवडिल्या अट घार (?) । व्ययस्त वीर पळती शूर । पिशाचगणा आनंद थोर । कबंधे नाचों लागली. ॥ ६५ ॥ सौभद्रशरांच्या माहामारीं । अमित सेना पातली दुरी । धुळी दाटली अंबरीं । कोण्हा कोण्ही दिसेना. ।। ६६ ।। पळों जातां जिकडे तिकडे । सौभद्र शरांच्या वाडेकोडे । आड बाण येती तिकडे । थकित शूर शूरेंसी. ॥ ६७ ।। दानवीसेनेत सहस्राक्ष । विचरे तैसा आर्जुनी दक्ष । कोण्ही आलिया समक्ष । लावी वाटे यमाच्या. ॥ ६८ ॥ सहस्रशः वीर कदनीं । मर्दुनी वीर फिरे रणीं । वीर भाविती पाशपाणी । न्यावया आम्हां पातला. ॥ ६९ ॥ धृतराष्ट्र वदे, ‘संजया! । सौभद्रबाळ विचित्र चर्या । एकलेन महींद्रवय । विगत केले सवते. ॥ ७० ॥ धन्य जननी आणि जनिता । कुळीं कुळदीप समान सविता । कुरुवंशार्णव अक्षोभता। वीर रत्ने निपजती. ॥ ७१ ॥ असो. पांडव तयापाठी । किमर्थ न येती सांगे गोष्टी ? । तया अटक करितां सृष्टी । सुरसमूहो माघारे. ॥ ७२ ॥ तरी ते तयाचे सुचरित । करीं माते बाळका ! श्रुत. संजय म्हणे, ‘देई चित्त । सांगतों नृपा ऐकिजे.' ॥ ७३ ॥ सौभद्र रिघतां सेनाउदधी । पाठीं पांडवचमूलाटावृद्धी । लोटतां सैंधववेळासंधी । थोकोनी करी परौता. ॥ ७४ ॥ महायशस्वी धर्मराज । रौद्र प्रतापी तनयानुजः । शिखंडी, सात्यकी, माद्रीतनुज । धृष्टद्युम्न, विराट. ॥ ७५ ॥ द्रुपद, कैकेय, धृष्टकेतू । मत्स्याधिराज विशाळकेतू । थडकतां विक्रमें तव जामातू । क्षीण करी क्षणार्धे. ॥ ७६ ॥ अद्भुत पौष तये समयीं । देखिलें चोज सुरांहृदयीं । जैसे रावणात्मजें शरघायीं । वानरचमू खिळियले. ॥ ७७ ॥ तैसे एकलेने विराजे । पांडवी सेना निस्तेज तेजें । केली.' ऐकतां हँर्षभोजें । राजा पुसे संजया. ॥ ७८ ॥ ‘अपूर्व बाळका! सांगसी कोडें । पांडव शूरांचिया पाडे । एकांग सैंधवे केले वेडे । कोण्या बळे सांग पां?' ॥ ७९ ॥ संजय म्हणे, • १. इंद्रगोप नांवाच्या तांबड्या किड्यांच्या रंगांच्या मुली. २. निर्जीव चित्तें सजीव केलीं-हा • भावार्थ, ३. मोठ्या आवडीनें., ४. येथे अनुजतनय' असा शुद्ध समास पाहिजे होता ५. जयद्रथ हा दुःशीला नामक धृतराष्टकन्येचा पति. ६. पराक्रम. 19. मोठ्या आनंदाने आणि आवडीने, भोज=आवड, इच्छा, संतोष.