पान:महाभारत.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ नरहरिकृत [द्रोणपर्व वीरक्षय होतसे दारुण । ईर्षा नये गुरुवर्या ॥ २६ ॥ तंव दुःशासन आफळी बाहो । म्हणे, ‘तो रणदेवीचा नाहो । तरी मी समक्ष केतरांहो । नाश करीन तयाचा. ॥ २७ ॥ राजाधिराजा ! आपुले नयनीं । पाहसी सौभद्र पडिला रणीं । पुत्रशोकाचे शोकासनीं । पांडवांते वर्धीन.' ॥ २८ ॥ ऐकोनी आल्हाद दुर्योधना । वीरांसहित धाडिला रणा । अनेक वाद्यघोष नाना । भेरी, झल्लरी, मृदंग, ॥ २९॥ पणव, क्रकच, ढोल, नफेरी । शृंगें, बॅगें, कर्णे, मोहरी । प्रभिन्न शंख वाजंतरीं । सिंहनाद वीरांचे. ॥ ३० ॥ सेनाअग्री दुःशासन । लोटोनी पांडवा विधिले बाण । येरें निवारुनी बाणघन । ‘यावें म्हणे, ‘कां आजी? ।। ३१ ।। काका म्हणावें हीन जाती । तैसी चमूची वर्णव्यक्ती । साध्वी देवी द्रौपदी सती । कपटद्युतीं छळियली. ॥ ३२ ॥ जे विराटाची सम भगिनी । देवतास्त्रियांतें मुंखरणी । पांडवसिंहांची धर्मपत्नी । वंद्य सव जगाते. ॥ ३३ ॥ विनय आर्जव सदाचारी । क्षमा, दया, शांति, मंगळ गौरी । पतिवाक्यनिरत मधुरोत्तरी । नास्तिक्यशब्दा नातळे. ॥ ३४ ॥ सर्वांगुणीं गुणमंडण । लावण्य समुद्रींचे दिव्य रत्न । कौरवकुळाचे कुळभूषण । जें मंडण धार्मिकां ॥ ३५ ।। धार्मिक धर्म धर्मी निरत । दुःशब्दवचनीं छळिला बहुत । भीमसेन काळ कृतांत । वांकुल्या त्यातें दाविल्या. ॥ ३६ ॥ तैपासुनी तुजला हीना ! । धुंडितां प्राप्त जाहलासी रणा । तूतें पाठवूनी काळसदना । अनृणी होणे जनकाचे.' ।। ३७ ॥ ऐसें वदोनियां वचनीं । शर सजिला काळाग्निमानी । आकर्ण वोढोनियां त्राणीं । बाहुवीर्य सोडिला. ॥ ३८ ॥ सुसाट सुटला गरुडवेगें । तेजें दिशा डवरिल अंगें । शत्रुदेहें भेदोनियां रागें । धरेतळीं विझाले. ॥ ३९ ॥ जेंवीं वारुळीं शिरके अही । तैसा बाण भेदुनी देहीं । रक्तमांस प्राशोनी मही । निमग्न जाला क्षणार्धं. ॥ ४० ॥ हाची दृष्टांत पुनःपुन्हा । देतां विकल्प श्रोतेजनां । तरी जे बोलिलें विचक्षणा । मीही तेची अनुवादें. ॥ ४१ ।। असो; त्यावरी क्रोधानळीं । पंचपंच प्रदीप्त भाळी । अर्पण करितां हृदयकमळीं । दुःशासन मूच्छितू ॥ ४२ ॥ बीभत्स गात्रे रक्तांग सकळीं । आहा !!शब्दें कौरवदळीं । हाहाकार वीरमंडळीं । घोरतुंबळ माजला. ॥ ४३ ॥ सारथी मदनी ताडिले हय । पांडववीरां आनंदमय । । १. दंड ठोकी. २. केतू व राहू. ३. अभिमन्यूनें. ४. काक-कावळा. काका=चुलता. येथे अभिमन्यु दुःशासनाची, कावळ्याच्या दृष्टांत देऊन, निर्भत्र्सना करीत आहे. ५. येथे 'तैसीचे तुमची' असा शुद्ध पाठ असावा. ६ श्रेष्ठ. ७. हाच दृष्टांत मूळांतही आहे. (अध्याय ४० झोक ११-१२). ८. पंचवीस,