पान:महाभारत.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० अध्याय] महाभारत, ७३ निघाते. ॥ ७ ॥ फोडुनियां : विकट हाक । ‘तिष्ठतिष्ठ' म्हणे देख ।। सौभद्र होवोनी हास्यमुख । चाप पाणी कर्षिलें. ॥ ८ ॥ त्वरा करूनी शरसंधानीं । रथ ससूत, वाजी गुणी । ध्वज, धनु, वर्म छेदोनी झणी। भूप धरण पाडिला. ॥ ९ ॥ रथरक्षक प्रतापी मानी । शिरें खंडुनी पाडिले अवनी ।। *साधु साधु' ह्या वचनीं । वीरमांदी गजली. ॥ १० ॥ अनुचरसेना भ्रष्टमान । लंघिते जाले दिशांचे मान । वरवळले वीर घन । गजाश्वरथी पदाती. ॥११॥ बाप आर्जुनी वीर सुभग । कृष्णार्जुनापासाव विद्या सांग । पावला, त्याचे वीरश्रीरंग । दावी सकळां क्षत्रियां. ॥ १२ ॥ शर, वर्षांनी काळधाडी । वीर वीर त्रासिले प्रौढी । दुःसह मानोनी वीरांच्या कोडी । रोषानळे धडकला. ॥ १३ ॥ कर्ण, कृप, द्रोण, द्रौणी, शल्य । दुर्योधन, सोमदंती, सौबळ । अनेक वीरांचे तुंबळ । शस्त्रधारीं वर्षती. ॥ १४ ॥ अलातचक्राचिये सरी ।। मध्ये वेष्टिला केसरी । येरे बाण सोडूनियां समरीं । सहस्रशः वीर मर्दिले. ॥ १५ ॥ हर्षयुक्त द्रोण कृपाचार्या । बोलता जाहला सद्गद काया । म्हणे, ‘पाहें पां ऋषिराया ! । कोण विद्या वीराची ! ॥ १६ ।। खांडवदाहाचा नंदन । संसारशत्रूचा भाचा जाण ।। राँमस्वसाजठरी रत्न । कुळदीपक जन्मला. ॥ १७॥ धन्य कुरुवंश वंशाभरण । कीर्ती उजळिलें स्वर्गभुवन । पंच पांडव प्रतापवान । हर्षकारी त्यांसही. १८ ॥ वय पाहतां कुमारदशा । समान विक्रम सुराधीशा । वीरमंडळीं ययाऐसा । वीर नाहीं सर्वथा. ॥ १९ ॥ संग्रामसागर क्षयारंभीं । वीरलोट उसळती नभीं । तारूंसौभद्र धैर्यस्तंभीं । वातवेगें विचरतू. ॥२०॥ पार्थप्रताप वाणिजे वाणी । तरी तो सुरेंद्र पुत्र गुणी । विजयी अस्त्र सुरप्रदानीं । दैवयोगें. लाधला. ॥२१॥ अक्षयी रथधुरे हॅरी । अक्षयी भाते, ध्वजाग्री हेरी । [रथ मिरवी श्रीरंग हरि] । हारी युद्ध केवीं पां? ॥ २२ ॥ ऐसी नसतां युद्धसँमादी । एकांग वीर समान उदधी । अर्जुनाहूनी शतावधी । विक्रम याचा आगळा.' ॥ २३ ॥ ऐसी प्रशंसा ऐकोनी कर्णी । दुर्योधन जल्पोनी मनीं । बोलता जाहला प्रफुलबाणी । दुःशासनाकर्णाते. ॥ २४ ॥ म्हणे, टोण पांडवभाट । भाँटीव करी, त्याची वाट । पाहणे, हेची मूर्खत्व श्रेष्ठ । वीरां सर्व जाण पां. ॥ २५ ।। प्रिय शिष्याचा नंदन । लालन करी, न करी कदन । १. हाताने. २. चढाई करून गेले. ३. बळिरामाच्या बहिणीच्या (सुभद्रेच्या) पोटीं. ४. घोडे, ५. मारुति. ६. पराजय. ७. युद्धाची सामग्री, साहित्य. ८. थोर, मोठा. हे द्रोणाचार्यकृत अभि. मन्यपराक्रमवर्णन मूळापेक्षा सरस आहे (अध्याय ३९ लोक १०-१३ पहा), ९. पांस्तुतिपाठक, १०. स्तुतिपाठ. ११ न० द्रो० हैं