पान:महाभारत.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ नरहरिकृत [द्रोणपर्व बाणीं । सोडोनी क्षतक्षित केला रणीं । सात बाण अशनीमानी । कृतवर्यासी अर्पिले. ।। १३८ । शल्यराया बोपोनी बाण । सूतवाजी घेतले प्राणे ।। अमित वर्षांनी इषु घन । वीरवीर त्राँसिले. ॥ १३९ । माघारल्या वीरांच्या कोटी । पुढां पाय न घालवे सृष्टी । हर्षानंदें मुखसंपुटीं । गर्जना करी हरिखें. ॥ १४० ॥ जैसी शरपंजरीं वानरचमू । शैलारित्रु पावती श्रमू । की रुक्मिणीसैंवरीं बळिरामू । करी विगती नृपाते. ॥ १४१ ॥ ना ते सौभसेना दुःखावर्ती । पाववी जैसी भामापती । कीं बाणचमू विगतगती ।। करी जेवीं रतिनीहो. ॥ १४२ ॥ तयापरी भ्रष्टुनी पृतना । सौभद्र विचरे रणांगणा । भूते भाविती अंत प्राण । पॉशपाणी समक्ष. ॥ १४३ ।। असो; पुढे संग्राम थोर । होईल महा घोरांदेरे । त्या वीररसाचे पान मधुर । श्रोते सज्जनीं सेविजे. ॥ १४४ ॥ श्रीगुरुभीमराज कृपाघन । कृपासुढाळ वर्षतां घन । नरहरमोरेश्वर नदीमार्ने । भारत वर्णी सुसाटें. ॥ १४५ ॥ अध्याय दहावा. | धृतराष्ट्र म्हणे, ‘गवल्गणी! । कुमारवयसा वीर फाल्गुनी । परी प्रताप न पुरे धरणी । सुरेंद्रमान जाण पां. ॥ १ ॥ सान म्हणों नये कृशान । बटु न। म्हणिजे वामन । ब्राह्मण म्हणों नये जमदग्न । वीर राजे प्रतापी. ॥ २ ॥ तयापरी गुणवर्धन । सौभद्र शूर वंशाभरण । पुढे काय करी विक्रम घन । करीं, तो माते निवेदी.' ॥ ३ ॥ संजय म्हणे, ‘सार्वभौमा ! । सादर ऐकें ऐश्वयेदमा! । सौभद्राचा प्रतापमहिमा । आश्चर्यकर सुरांतें. ॥ ४ ॥ बालार्ककिरणी स्पंदन घन । ध्वजापताकी विराजमान । अभिमन्युवीर सुरेंद्रमान । विचरे अंतकासारिखा. ।। ५ ।। कौरव वीर पाहोन नेत्रीं । संतापले थोर गात्रीं । दुःसह मानोनी भूपक्षत्री । शल्यबंधु लोटला. ॥ ६ ॥ शैल्यकर्ता वैरिया काया । यालागीं नाम शल्य तया । दाहा बाण पांडवराया । अर्पिता जाहला | १. जखमेमुळे व्याकुळ, २. वज्राप्रमाणे. ३. घाबरवून सोडले. ४. पर्वतशत्रूचे (इंद्राचे) शत्रु (राक्षस). ५. शिशुपाळनामक राजास. ६. शाल्वसैन्याला. ७. बाणासुराचे सैन्य. ८. मदनावतार व कृष्णपुत्र प्रद्युम्न. नाहो=नाथ, पति. ९. भूतें प्राण अंत भाविती, असा अन्वय. १०. यम. ११. प्रत्यक्ष मूर्तिमंत. १२. फार भयंकर. १३. कृपेची वृष्टि. १४. (पुरामुळे दुथडा वाहात असलेल्या) नदीप्रमाणे. १५. वेगानें, आवेशाने. १६. संजया. १७• क्षत्रियांतक परशुराम १८. वैभवनिधे! दम=धाम, घर. १९. क्षत्रिय राजे. २०. पीडा करणारा.