पान:महाभारत.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ अध्याय महाभारत, पुन्हा युद्धा धडकले. ॥१२०॥ वीरसमूहो समुद्रथडी । शैरलाटा उसळती प्रौढ़ी। सौभद्रवेळ वाळूकांडी । थोकोनी करी परौता. ॥१२१॥ वाजिवारण पदातिरथी। वेष्ट्रनियां उत्तरापती । वर्षते जाले इर्षांच्या पंक्ती । अहिविषासारिख्या. ॥ १२२ ॥ दुःसह अर्पिले नवबाण । शिळाशित तीक्ष्ण घन । दुःशासने बारा प्रभिन्न । हेमपुंखी सोडिले. ॥ १२३॥ शारद्वते विधिले तीन । द्रोणे सत्तर महाज्वलिन । विंशती समर्षी सत्याहत्तर बाण । काळघाती प्रभिन्न. ॥ १२४ ॥ कृतवर्मा यादवेश्वर । सात नाराच अप घोर । बृहद्वळ तीक्ष्ण शर । आठ ताडी सौभद्रा. ॥ १२५ ॥ भूरिश्रवा चैरप्र तीन । मद्रराज सौबळ ज्वलीन । सौबळद्वय भुजंगमान । तीन राजा कुरुवर्य. ॥ १२६ ॥ बाप अभिमन्यु प्रतापराणा । निवारी एकदा त्यांचिया बाणा । तीन तीन अर्षी सर्वांजणा । रक्तांगीं सब डवरिलें. ।। १२७ ॥ थोर विद्येचे लाघव । हस्तकळा परम जवे । मंत्रशस्त्राचे तीव्र गौरव । थकित वीर सर्वही. ॥ १२८ ॥ शरासनीं कर्षांनी मुष्टी । शर सोडिले कोटीच्या कोटी । जाणों प्रळयदामिनीवृष्टी । विन्मुख पाठी वीरांच्या. ॥ १२९ ॥ पळतां शूरांतें भूमि थोडी । पाई पडताती वेंगुँडी । पडती जैशा उतरडी । तळीं पात्रे भंगिल्या. ॥ १३० ॥ रौद्र संग्राम घोर वळसा । वीर निघाले सांडुनी धिवसा । द्रोणाचार्य पावोनी त्रासा। पुन्हा लोटे वीरासी. ।। १३१ ॥ कृपाचार्य, कर्ण, द्रोण, द्रौणी । शैली, शल्य, भूरिश्रवा, शकुनी । क्राथ, सोमदत्त, विंशती गुणी । वृंदारक, ललीत्थ, ॥ १३२ । वृषसेन, सुषेण, प्रतर्दन । कुंडभेदी, दीर्घलोचन । प्रबाहु आणि दुर्योधन । अनेक वीर सहस्रशः. ॥ १३३ ॥ धडकोनियां शरासनीं । शर वर्षिले कृशानेकिरणी । अभिमन्यु अमित वज्रठाणी । जेवीं राम दाशरथी. ॥ १३४ ॥ चाप कर्पोनी आकर्ण घन । नक्षत्रसंख्या सोडिले बाण । कर्णहृदय भेदोनी पूर्ण । धरेमाजी विझाले. ॥ १३५ ॥ जेवीं फणी रिघती बिळीं । तैशा भेदुनी गेल्या भाळी । अकंप कर्ण क्रोधानळीं । उल्का वमी विषाच्या, ॥ १३६ ॥ कुंडभेदी, दीर्घलोचन । सुषेणादि तीन तीन बाण । सौभद्रे ताड़नी केले क्षीण । पुढां येतां थोकले. ॥ १३७ ॥ अश्वत्थामा पंचवी १. बाणरूपी लाटा (किंवा) पाण्याच्या लाटा. शर=(१)बाण, (२) पाणी. २. अभिमन्यु हाच समुद्राचा किनारा. ३. बाण. ४. हस्तकौशल्य. ५. वेग. ६. वांकडेतिकडेपणाची स्थिति. हा शब्द मुक्तेश्वराच्या कवितेतही आढळतो:-‘उदरपृष्टीची घडी । करुनी चरणांची वेंगडी । झोंक सांवरितां दंडीं । शब्द तोंडी न बोलवे. ॥' हरिश्चंद्राख्यान-अध्याय ४।७२. ७. उतरडीच्या मूळाचे बुडाचे-भांडे किंवा मडके फोडले असतां. ८. भरवंसा, धैर्य. ९. अग्निसदृश,