पान:महाभारत.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.७० नरहरिकृत (द्रोणपर्व पर्वताकृती । घंटा, नेपुरे, पाखरा किती । धुळीमाजी लोळती. ॥ १०२ ॥ अश्वरने भूषित भूषणीं । सहित स्वार पाडिले रणीं । शोणितरंगे रंगली धरणी । भूषणे शस्त्र अपार. ॥ १०३ ।। पदाति वीर वस्त्राभरणी । गदामुद्गरपाशपाणी। लहुडी, चक्र, त्रिशूळ, किरणी । भिडिमाळादि अनेक. ॥ १०४ ॥ खंडविखंड गात्रस्थानीं । होउनी पडिले समरांगणीं । हुंबती, क्रंदती, बोभाती वाणी । ‘काका! मामा ! बांधवा !' ।। १०५ ॥ सहस्रशः वीर रणांगणीं। पडिले बीभत्स वस्त्राभरणी । रोमवसनी, ऊर्णवसनी । चर्मवसनी, यवनादी. ॥ १०६ ॥ गजाश्ववीर छिन्नगात्री । शवें दाटली निबिड धात्री । हलकल्लोळ सेनासत्रीं । भूतगणा आल्हादू. ॥ १०७ ॥ प्रळयकाळ भावोनी वीरीं । भयचकित पळती दूरी । जैसा अग्नि धडकतां वनांतरीं । श्वापदांतें आकांतू. ॥ १०८ ॥ ना तो विष्णु दानवी सेना । विगत करुनी लाविली रणा । कीं तो महेश कैलासराणा । भ्रष्टी त्रिपुरा ज्यापरी. ॥ १०९ ॥ तयापरी एकांग वीर । सौभद्र शूर रणरंगधीर । विचरे जैसा समीर । अटक कोठे असेना. ॥ ११० ॥ देखोनी संतप्त दुर्योधन । रोपें अधर चावोनी पूर्ण । लोटला जैसा पंचानन । शस्त्रघायीं ताडिल्या. ॥ १११ ॥ द्रोण बोले मैहींद्रांप्रती । “काय पळतां ? धरा शक्ती । देह मृत्यूचा सांगाती । पळतां अमर होइजे? ॥ ११२ । कीर्तीने जावें स्वर्गधामा । हाची क्षत्रियां धर्म तुम्हां । भय त्यागोनी, क्रोधगरिमा । रक्षा वेगीं रायतें.' ॥ ११३ ॥ ऐसें वदोनी गुरूच्या पाठी । धांवतां लोटल्या वीरांच्या थाटी । भुकुटीसी घालोनियां गांठी । कृपद्रौणी तगटले. ॥ ११४ । कर्ण, कृतवर्मा, सौबळ । मद्रराज, भूरिश्रवा, शल्य । पौर, वृषसेन, बृहद्वळ । अनेक भूप लोटले. ॥ ११५ ॥ सहस्रशः एकेची वेळा । बुजोनी काढिला सौभद्र तळा । वर्षला खरशरौघमाळा । अंगुष्ठही दिसेना. || ११६ ॥ जैसी कुलीन पतिव्रता । अवयवांतें लोपी दृढता । कीं साधु आपुली गुणवार्ता । आच्छादित ज्यापरी. ॥ ११७ ॥ तैसा आर्जुनी वीरराज । अचळ रणीं ऐश्वर्यबीज । शरासनीं शर सुतेज । कोटीच्या कोटी सोडिल्या. ॥ ११८ ।। वात वितळी अभ्रपडळा । तेवीं विगत शरौघमाळा । करोनी त्रासिलें वीरां सकळां । विन्मुखसेना अर्दितू. ॥ ११९ ॥ सिंहरवे फोडुनी हाक । फाल्गुनी रणीं अमित देख । विन्मुख वीर द्रोणादिक । १. पाखरा=हत्ती किंवा घोडे यांचे चिलखत. २. राक्षसांची. ३. वायु, ४. ओंठ. दांतओंठ चावणे-हें रोगाचे एक चिन्ह आहे. ५. सर्व राजांप्रत. ६. मित्र, सोबती. ७. पळालेत तर अमर व्हाल काय?-हा इत्यर्थ.