पान:महाभारत.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ ९ अध्याय] महाभरते. कळा सूत्र । धर्मआज्ञा अग्निस्पर्शमात्र । काष्ठे गोळा उसळला. ॥ ८५ ॥ वीरांमुखी किलकिलाट । ‘आला आला' म्हणती सुभट। ‘घ्या, घ्या, मारा' शब्द वरिष्ठ । सर्वांमुखी माजला. ॥ ८६ ॥ अनेक वाद्य वाजंतरीं । ढोल, दमामे, शृंग, भेरी । हलक्या, बुरंगे, नफेरी । एक घायीं बहुविध. ॥ ८७ ॥ जैसे नदीपुराचे लोट । धांवले तैसे वीरसंघाट । करुनी दुर्गकोट । सौभद्र मध्ये वेष्टिला. ॥ ८८ ॥ हस्ती, पदाती, असिवार । रथिया रथी शस्त्रसंभार । सोडिते जाले एकधार । जेवीं वाकुडी पुंष्याची. ॥ ८९ ॥ बाप अभिमन्य वीरराजू । शर सोडिले तेजःपुंजू । तिखौरधार, मेषध्वजू । जाणों भासे अवयवी. ॥ ९० ॥ निवारोनी शरें त्यांचिया वृष्टी । वीर वीर भेदिले हटी । विगत करुनी सेनामिठी। मध्यभागीं शिरकला. ॥ ९१ ।। जैसा सिंह वारणदळीं । निघोनी त्यांची करी खंदळी । कीं अशोक राक्षसफळी । करी धुळी हनुमंतू. ॥ ९२ ॥ तयापरी सुरेंद्रसूनू। तनय नुरवी वीरां भानू । जाणों प्रदीप्त प्रळयभानू । क्षयालागीं क्षोभला. ॥ ९३ ॥ बाहुवीर्य अमोघ घन । कोटीच्या कोटी सोडिले बाण । कणीक नळीक क्षयरूप जाण । सायकादि वत्सदंत. ॥ ९४ ॥ जाणों समक्ष काळदशन । तक्षकविणें घोळिले पूर्ण । वृश्चिकपुच्छा पीठे पाषाण । तया पृष्ठी निर्मिले. ॥ ९५ ॥ ऐसिया शरांच्या वोघमाळा । लाविल्या देहुंड्या हस्तकळा । धडधडाट वन्हिज्वाळा । जेवीं वना धडकती. ॥ ९६ ।। तटतटां वीर पडती रणीं । थटथटां शिरें उडती रणीं । रुक्मकुंडलें शुक्रगुरुमानी । दिशा तेजें उजळती. ॥ ९७ ॥ सुंदर नास, आकर्ण नयन । विशाळ भाळ केशरपूर्ण । प्रवाळवोष्ठ, कुंदरदन । श्रीमुख शशीसाजिरें. ॥ ९८ ॥ ऐसिया शिरांचिया राशी । भूमी दाटल्या बाणकोशीं । भूषित बाहु अंगदेशीं । व्योममाग उडविले. ॥ ९९ ॥ उतरता भासती पंचबाणी । करमुद्रिका मुगुटमणी । मुष्टि शस्त्रे झळकती किरणी । जाणों गरळा विषाच्या. ॥ १० ॥ रुचिरकांत कोमळतनू । सुगंधचंदनीं चर्चिला घनू । खंडविखंड नुरुनी भानू । भूमी अपार पाडिल्या. ॥ १०१ ॥ वीरांसहित खंडूनी हस्ती । धरें पाडिले १. रंजूक, वात, सूत. २. अश्ववार, स्वार, ३. वृष्टि. वांकुडी=पावसाची झड. ४. पुष्य हैं एक भरपावसाचे नक्षत्र आहे. ५. तीक्ष्ण आहे धार ज्यांची असे. ६. मूर्तिमंत, सजीव. ७. अशोकनामक उद्यानांत. ८. देवश्रेष्ठ जो इंद्र त्याच्या पुत्राचा (अर्जुनाचा) तनय (अभिमन्य), ९. भान, देहभान. १०. बाणविशेष. ११. नालीक=भाला, बचीं. १२. प्रत्यक्ष, साक्षात. १३. आसन, बैठक. १४. मनोरे, माड्या. १५. शुक्र व गुरू यांच्या तान्यांप्रमाणे (तेजस्वी). १६. अंगदासकट.