पान:महाभारत.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ नरहरिकृत । [द्रोणपर्व करावी सोय । पाठी आम्ही सर्वत्र राय । जिंकोनी सेना क्षणार्धं, ॥ ६७ ॥ संग्रामसिंधूच्या आवर्ती । पडलों पुत्रा नव्हे निर्गती। नौकारूपें परपारप्राप्ती । करीं आम्हां याचकां.' ॥ ६८ ॥ अभिमन्यु म्हणे “आजी ताता ! । कायसी अवघड व्यूहाची कथा ? तुमची आज्ञा माझिया माथां । डोलवीन क्षत्रियां. ॥ ६९ ॥ यादवीकुशी माझे जनन । रेतदानी श्वेतवाहन । उभय कुळे प्रसिद्ध घन । मी दिनमणी वर्तलों. ॥ ७० ॥ तरी मी आजी उभय वंशा । सोज्वळ करुनी दशदिशा । भरुनी सर्व कीर्तिघोषा । भुवनत्रयीं अक्षयी. ॥ ७१ ॥ मी ऐकांग वीर आपुले प्रौढी । पृतना करीन देशधडी । कायसी द्रोणाची परवडी । दावीन चोज सर्वांतें. ॥ ७२ ॥ अग्नि धडकतां पर्वतमूळीं । सरकत कष्ट कायसा मौळीं ? । कीं अगस्ती रिघतां समुद्रजळीं । पैलपारा अविलंबे. ॥ ७३ ॥ ना ते वैकुंठीच्या चढोवोढी । केवीं गरुडातें सांकडी ? ।। की प्रळयवायूचा झडाडी । अटक केवीं महेंद्रा ? ॥ ७४ ॥ तयापरी व्यूहभेदनीं । नाहीं आडवारा माझिये मनीं । परी तुम्ही येतां द्रोण रणीं । आड आडवा सलंब.' ।। ७५ ॥ भीम बोले हर्षोत्तर । ‘तुझ्या पाठी सर्वही वीर । आम्ही रणनदी पात्रों पार । चिंता न करी; सुपुत्रा !' ॥ ७६ ॥ पितृवाक्यपुष्पांजळी । येरें वंदोनियां मौळीं; । नमन करितां पादयुगळीं । आशीर्वादें गौरविला. ।। ७७ ।। जयशब्द पिटोनी वाणी । वाद्य त्राहटिलें रणीं । सौभद्र हर्षयुक्त मनीं । जावया धामा उल्हासे. ॥ ७८ ॥ करुनी सेनेचा रगडा । कीर्तीचा उभवू पूर्ण चेंडा । सारथीयातें गौरवोनी विडा । रत्नमाळा अर्पिल्या. ॥ ७९ ॥ सारथी सारथ्यकलानिपुण । शस्त्रास्त्रमांदी भरुनी पूर्ण । बालार्ककिरणी स्पंदन घन । ध्वजपताकी सजिला. ॥ ८० ॥ च्याही वारू गुणसंपन्न । तरुण, सदृढ, वज्रठाण । जवे माघारती पवन । मनोरम, शुभद. ॥ ८१ ॥ हस्तकले डोलतां रज्जू । वारू उसळले जैसे विजू । सौभद्र वीर शिंताजू । जाणों कुमार दुसरा. ॥ ८२ ॥ वारणवृंद नरपार्थिव । सौभद्रमृगेंद्र घाली कैव । शर सोडिले प्रभिन्न हुव । धरातळीं सकंप. ॥ ८३ ॥ कीं तो काळ आयुष्यगणना । करितां, सौभद्र पातला रणा । धर्मआज्ञावेळीं पाश निपणा । कर्पोनी काळे वोढिला. ॥ ८४ ॥ ना तो कृतांतकाळयंत्रे । दारू आयुष्य, १. माना डोलवावयास लावीन, माझा पराक्रम पाहून ते माना डोलवतील–असा भाव. २. एकटा ३. (पर्वताच्या) शिखरापर्यंत. ४. रणस्थळावर. धाम=घर, स्थान, तेज, पराक्रम-असे अर्थ होतात. ५. सुमित्र नामक सारथि. ६. शिरोभूषण (श्रेष्ठ), ७, कार्तिकस्वामि. ८. उडी, पकड. ९. तोफ.