पान:महाभारत.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ ९ अध्याय] महाभारत हर्षशशी मावळला. ॥ ४९ ॥ जेवी नौका भंगितां विगतदशा । तारक लक्षितां दशदिशा । कीं कुटुंब पीडितां रोगपाशा । धांडोळिती वैद्याते; ॥ ५० ॥ तयापरी धर्मराज । वीरांतें बहु देतसे तेज । परी काळ भावोनी भारद्वाज । व्ययस्त बीर चौफेरी. ॥ ५१ ॥ तंव अकस्मात वीरकेसरी । देखिला सौभद्र पटकेसरी । ज्याचिया बळे न टिके सरी । पार्थाविण जाणं पां. ॥ ५२ ।। युवतरस्वी झालस्कंधी । आजानबाहु, ग्रीवावृद्धी । आठीवठाण, सोज्वळ बुद्धी । रुचिरकाया तेजस्वी. ॥ ५३ ।। मुखचंद्र विराजमान । कुमारदशा पूर्णिमा जाण । षोडश अब्दांचे प्रमाण । कळा सोळा विलसती. ॥ ५४ ॥ चौदा विद्या, चौसष्टी कळा । देहीं विसावल्या सकळा । धनुर्वेदीं वोतव गोळा । प्रगट जाला अवयव. ॥ ५५ ॥ कीं सुभद्राशुत्युदर विशाळ । मेघपार्थ, स्वात्युदक निर्मळ । सौभद्र निपजलें मुक्ताफळ । तेजें कौस्तुभ भासत. ॥ ५६ ॥ कीं तो अर्जुनवरुणालय । माजी सुभद्रालहरी वर्य । अभिमन्युचंद्र विकासमय । वंशाभरण सत्कीर्ती. ॥ १७ ॥ ना तो पार्थनंदनवन ।। यादवीमाधवी विराजमान । सौभंद्रसुरतरू युद्धदान । याचकक्षत्रियां गौरवी. ॥ ५८ ॥ कीं यादवपांडव पवित्र कुळीं । कुळदीप अभिमन्यु तेजें हेळी । ज्याचिया प्रतापाची कीळीं । विश्व सर्व डबरिलें. ॥ ५९॥ सत्यसंग्रही, निरतधर्मी, । शुची, दांत, विगतऊर्मी, । विप्रपूजन, आस्था कर्मी, । विनय, आर्जव, दक्षता. ॥ ६० ।। युगांतअंतक वैरियां पाही । विक्रमें दुजा भार्गव मही । बळप्रताप जैसा देही । भीमसेनासारिखा. ॥ ६१ ॥ धनुर्विद्या अर्ज नासम । गुण गांभीर्य धार्मिक धर्म । रूप लावण्य उत्तमोत्तम । मार नकुळासारिखें. ।। ६२ । कळा कौशल्य पुरुषार्थी । कृष्णासमान जाणिजे क्षिती । तेजें जैसा देव गभस्ती । विक्रमें इंद्र दुसरा. ॥ ६३ ॥ ऐसा सौभद्र विजयध्वज । देखोनी हर्षित धर्मराज । म्हणे, ‘बापा! प्रतापतेज । दावी सव क्षत्रियां. ॥ ६४ ॥ तुझिया पुत्रपणाच्या श्लाघ्यता । आम्ही वसिन्नलों सुरांच्या माथां । वंशाभरण अवनिजाकांता । तेवी तू पुत्रे कुरुकुळीं. ॥ ६५ ।। पाहीं पां तुझिया अज्ञचमू । विगतमानसें पावे श्रमू । चक्रव्यूहाचा न कळे क्रमू । निस्तेज वीर सर्वही. ॥ ६६ ॥ तरी तुवां आपुलें बाहुवीर्यं । भेदोनी व्यूह १. शोधिती. २. दाणादाण झालेले. ३. झाडांप्रमाणे विशाल आहेत खांदे ज्याचे, असा. ४. ज्याची बैठक अगदीं निश्चळ आहे असा. ५. अर्जुन हाच इंद्राचे नंदनवन. ६. सटा हीच माधवीलता. ७. अभिमन्यु हाच कल्पवृक्ष. ८. मूर्तिमंत, देद्धारी. ९. बढाईम, • • बढाईमुळे, स्तुत्य कृत्यामुळे. १०. रामास लहु व कुश हे दोन पुत्र होते, त्यांप्रमाणे पराक्रमी,