पान:महाभारत.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत [द्रोणपर्व कोटी । मूर्तिमंत आंगवल्या. ॥ ३२ ॥ कुरुवर्यराज शिखामणी । लक्ष्मण, सवें वीरश्रेणी । दाहा सहस्र धनुष्यपाणी । नामथिले पुरुषार्थी. ॥ ३३ ॥ दुर्योधन ऐश्वर्यनिधी । वेष्टित नृपांची वीरमांदी । मध्यभागी शोभाउदधी । छत्रचामरी मिरवला. ॥३४॥ राधेय, कर्ण, दुःशासन, । रुक्मस्पंदनीं विराजमान । कृप, द्रौणी राजश्रीमान्य, । समुद्रमान शोभले. ॥ ३५ ॥ ऍतनाअग्रीं द्रोणाचार्य । जाणों प्रभाते उदित सूर्य । सिंधुराज नृपतिसूर्य । गुरुसन्निध विराजे. ॥ ३६ ।। तयापॅरिसरी अश्वत्थामा । जाणों रुद्राची दिव्य प्रतिमा । तव पुत्र त्रिदशगरिमा । त्रिंदशांपरी जाण पां. ॥ ३७॥ जयद्रथाचिया पृष्ठीं । गाधारराज किर्तव हटी, । शल्य, भूरिश्रवा जगजेठी । वीरमांदी मिरवले. ॥ ३८ ॥ ऐसा वीरांचा एकवळा । जाणों अग्नीच्या ज्वाळमाळा । कीं क्षोभला काळ उदित काळा । पसरुनी मुख धांवला. ॥ ३९॥ ऐसियापरी कौरवभार । येतां लोटला वृकोदर । संगी वीर अमित क्रूर, । धीर, शूर, प्रतापी. ॥ ४०॥ सायकी आणि चेकितान । कुतिभोज भूप, धृष्टद्युम्न । द्रौपदीनंदन पांचजण । सौभद्र सिंहप्रतापी. ॥ ४१ ॥ क्षेत्रधर्मा, चेदी, धृष्टकेतु, । घटोत्कचराक्षस भैमी, माद्रीसुत्, । युधामन्यु, शिखंडी धूर्त, । मत्स्य, पांचाळ, संजय. ॥ ४२ ॥ यांहीवेगळे वसुंधानाथ । कृतास्त्र सर्वविद्यानिरत । थडकले, द्रोणे हर्षयुक्त । बाणकोटी सोडिल्या. ॥ ४३ ॥ धुंई आच्छादिजे दिनकरा। कीं पर्वतीं निविड जळधारा। असंभ्रांत शैलाकारा । भंगी वृष्टी तयाच्या. ॥ ४४ ॥ वीरसमुद्र क्षोभतां वेगें । वेळा गुरुवर्य जाला अंगें । विगत करुनी शरांची शृंगें । वीरवीर त्रासिले. ॥ ४५ ॥ क्रोधे प्रदीप्त द्रोणाचार्य । जाणों माध्यान्हीं प्रदीप्त सूर्य । बाहुविक्रमाचे गांभीर्य । अद्भुत रीया ! देखिलें. ॥४६॥ वीर शूर आलिया पुढे । संव्या वोपी कृतांताकडे । फिरुनी जातां मागिलेपाडे । कोण्ही नाहीं देखिला. ॥ ४७ ।। संजय, पांचाळ, विराट, । भूपमांदी वीर सुभट । विगत करुनी अर्पिले कष्ट । विन्मुख केले सर्वही. ॥४८॥ कासावीस धर्म मानसीं । कांहीं उपाय न चले त्यासी । धरे दाटल्या शवांच्या राशी। । १. देह धारण करित्या झाल्या. २. नामांकित. ३. फौजेच्या अघाडीस. ४. त्याच्या जवळ. ५. तीसपट मोठेपणा ज्याचा असा. ६. देवांप्रमाणे (अत्यंत पराक्रमी). ७. शकुनि, ८. कपटी, जुगारी, चूतानपुण. ९. धृष्टद्युम्नाचा पुत्र. ह्यास द्रोणाचार्यांनी मारिलें. १०. भीष्मपुत्र. हे घटोत्कचाचे विशेषण. ११. पृथ्वीपति (राजे). १२. धुक्याने. १३. अचळ, धैर्ययुक्त, शांत. १४. मर्यादा, सीमा, समुद्राचा किनारा. १५• धृतराष्ट्रा! १६. सद्यः, तत्काळ, ताबडतोब. १७. उत्तम योद्ध