पान:महाभारत.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ अध्याय महाभारत. सारथी । तेथे केवीं जय विगती । होय करिसी ? नरेंद्रा! ॥ १५ ॥ असो; ऐसिया नृपवृंदा । आजी रणीं वोपीन आपदा । व्यूह निर्मोनी, ज्याचिया भेदा । इंद्रादिकां न करवे. ॥ १६ ॥ संशप्तकांचिया युद्धा । सव्यसाची गेलिया सध्या । चक्रव्यूह निर्मोनियां बुद्धया । जो अंचोज सुरांतें. ॥ १७ ॥ ज्याचा भेद महासमर्थे । जाणो भार्गव, प्रद्युम्न, पार्थं । चवथा हो कां सुभद्रासुतू । अढळ पैरता नसे पां. ॥ १८ ॥ चौघांविरहित भूमंडळीं । नाहींत वीर अंतुर्बळी । षड्थी मिळोनी एकमेळीं. । सावध सर्वी असावें. ॥ १९ ॥ व्यूहभेदनीं धनुर्वाडौं । येईल शूर सौभद्र गाढा । करील चमूचा थोर रगडा । महायोद्धा प्रतापी. ॥ २० ॥ सर्वै राहूनी सावधान । मरणभयाचे विसरिजे भान । त्यावरी शिवाचे वरदान । सैंधवाते लाधलें. ॥ २१ ॥ तरी मी आजी समरांगणीं । एका पांडवा काळसदनीं । वोपीन हे अचूक वाणी । धातियाची जाण पां. ॥ २२ ॥ आचार्यमुखींची ऐकोनी गोष्टी । दुर्योधना आल्हाद कोटी । गौरवोनी वीरांच्या कोटी । थापटी पाठी उत्साहे. ॥२३॥ पिटोनियां संग्रामभेरी । अनेक वाद्ये थोर गजरीं । सेनासमुद्र लोटला समरीं । चक्रव्यूह निर्मोनी. ॥ २४ ॥ पांडवसेना कडकडाटी । लोटली जैसी कृतांतमिठी । विजयरथीं कृष्णकिरीटी । बालार्ककिरणीं शोभले. ॥ २५॥ तंव संशप्तकाचे दूत । काळआमंत्रणा आले त्वरित । वृत्तांत ऐकोनी सुभद्राकांत । जाता जाहला संग्रामा. ॥ २६ ॥ जैसे मरण घेइजे मोलें । कीं जळते गृहीं निद्रासोहळे । ना ते शस्त्र घर्षिजे कंठनाळे । मरण कैसे पाहावया. ॥ २७ ॥ की दाटोनी हरिकेजाळीं । फैणी धरूं धाविजे हस्तकमळीं । ना तो अंगि धडकतां, ज्वाळमाळीं । टाकितां उडी, वांचिजे. ॥ २८ ॥ तयापरी संशप्तकीं । मरण बळे आणिलें तोकीं.। असो, द्रोणाचार्य महातवकीं । पांडवचमू लोटला. ॥ २९ ॥ कौरखवीर बळसमर्थ । नृपवृदें युवतरवी धूर्तृ । कृतास्त्र सर्वविद्यानिरतू । रुक्मध्वज साजिरे. ॥ ३० ॥ रक्तांबर सुवर्णमाळा । रत्नभूषणीं फांकती कीळा । रक्तपताका ज्वाळमाळा । हेमस्यंदन नेटके. ॥ ३१ ॥ चंदन अगरू अंगीं उठी । केशरें भाळ चचिलें बोटीं । जाणों मदनाच्या | १. बुद्धिपूर्वक, मुद्दाम. २. अगम्य, अभेद्य. ३. चौघांशिवाय दुसरा कोणी. ४. बलवान ५. धनुर्धर. ६. जयद्रथानें रुद्राचे आराधन करून त्यास प्रसन्न केले. तेव्हां रुद्राने अर्जुन नसतान एक वेळ तं पांडवांचा पराभव करशील' असा त्यास वर दिला होता. (पुढे अध्याय १, अव्या ७०-८८ पहा), ७. हारक नामक वृक्षाच्या जाळींत, ८, सर्प, ९ नया आवेशी. १० न० द्रो० धाच्या जाळींत. ८. सर्प. ९. नव्या दमाचीं व