पान:महाभारत.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत द्रोणपर्व भीमार्जुन । समिधा चतुरंग सैन्य । ऋत्विज मुख्य यदुनंदन । इंष्टी सांग त्याचेनी. ॥ १३८ ।। त्यांमाजी द्वितीयदिवसयुद्धसमाप्ती । भगदत्ताची होमिली आहुती । पुढे अवदान उत्तरापती । तृतीय इष्टी नेमिली. ॥ १३९ ॥ तेवी र अति सुरसू । थकित शूर शूरांचा इषु । श्रोते संतसज्जनीं हिमांशू । चकोरप्राय सेविजे. ॥ १४० ॥ श्रीगुरु[भीमराजनिशाकर । कृपारश्मी करितां प्रसर । सोमकांत नरहरमोरेश्वर । प्राय करी भारत. ॥ १४१ ॥ अध्याय नववा. संजय म्हणे, ‘राजया ! दक्षा ! । भरतकुळवंशजपक्षा! । कीर्तिमैलागरू! धर्मवृक्षा! । छाया जनां सुखकारी. ॥ १ ॥ शिबिरा पावोनी उभय चम् । निशी विश्रामतां सर्व श्रमू । उदया येतां तेजिष्टधामू । दिवाकर त्रिमूर्ती. ॥ २॥ आन्हिक कर्म सारूनी नेम । षड्स भोजनक्रम । सारूनियां, गंधमाल्यादि उत्तम । विविध वस्त्र भूषिले. ॥ ३ ॥ विचित्र वहने प्रदीप्तकांती । जाणों नक्षत्रगण पातले क्षिती । वीर वळंघोनी पुरुषार्थशक्ती । अनेक शस्त्र दाटले. ॥ ४ ॥ वीरश्रीउत्साहें वीर मनीं । शस्त्रे तुकोनी लोटले रणीं । द्रोणाचार्य गौल्यतावाणी । दुर्योधना अनुवादे. ॥ ५ ॥ म्हणे, ‘राजया ! सार्वभौमा ! । ऐश्वर्यनिधी ! वासवप्रतिमा ! । सेनाउदधी ! कल्पद्रुमा ! । जनां सर्वा सुखकारी. ॥ ६ ॥ नित्य पृतना पावे खेदू । तेणे हृदयीं जातवेदू । धडकला, तेणें शौर्यमेंदू । मंद जाला वीरांचा. ॥ ७ ॥ जैसी रजस्वला लिप्त दोषीं । बाहेर फिरे विवर्णतोषी । कीं सूतकी ब्राह्मण लोकराशी । देखोनी पळे ज्यापरी; ॥ ४ ॥ तयापरी नित्य । पृतना । भ्रष्ट होतसे विचक्षणा । दुर्धर पार्थाचिया संधाना । उभा काळ भीतसे. ।। ९ । सुरांसहित सुरेश्वरू। आणि धरेचे धनुर्धरू। मिनतां अर्जुन वीर शूरू । अजिंक्य जेवीं पिनाकी.' ॥ १० ॥ ‘धर्म धार्मिक सत्यवादी । क्षमा, दया, समान बुद्धी, । हरिभजनीं प्रेमवृद्धी । साधुसेवनीं नम्रता. ॥११ ।। सगुणब्रह्म कैवल्यपती । जो हरातें आराध्यमूर्ती । ब्रह्मादिकां अव्यक्त व्यक्ती ।। अंत अनंता न लभेची; ॥ १२ ॥ नारदसनकादिक । वेडे होवोनी फिरती लोक । इंद्रासी अमरपदाची भीक । कृपेने ज्याच्या लाधली; ॥ १३ ॥ तो दानवारी मधुहंता । दावानळ प्राशन कर्ता । त्रिजगचळणा ज्याची सत्ता । अतक्ये तर्क तर्केना. ॥ १४ ॥ तो भक्तिभावें कमळापती । जाला पार्थाचा | । १. यज्ञ, होम. २. आहुति. ३. अभिमन्यु. ४. येथे ‘पाझर' किंवा ‘प्रसव' असा शुद्ध पाठ असावा. ५. पलून. ६. मधुरोक्तीनं. ७, अग्नि. ८. शेषाला.