पान:महाभारत.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अध्याय महाभारत, ६३ शस्त्र फिरती मागां । वारण शिरकोनी अश्वदांगा । मर्दन करिती तयांतें. ॥ १२० ।। अनन्य युद्धीं घोर पाहीं । माजलें तुंबळ घोर मही। मरणभय विसरूनी तेही । भिडती हावा संग्राम. ॥ १२१ ॥ रथी धांवोनी मारिती द्विरदा । सरकोनी गज करी त्यांचा चेंदा । पदाति लोटुनी अश्ववृंदा । मारामारी पेटती. ॥ १२२ ॥ शूरत्वमदें रणधुमाळी । मोडितां शत्र, हातफळी । भिंडोनी फोडिती आरोळी । मल्लयुद्धा मिसळती. ॥ १२३ ॥ रथअश्ववारणवृंद । भूमी प्रतापघोर विशद । शवें दाटलीं, हृदयीं खेद । काळाच्याही होतसे.॥१२४॥ घायाळ चरफडती शस्त्रघायीं । एका शब्द न बोलवे कांहीं । एक वोदिती चरण मही। हुंबेती घायी अपार. ॥ १२५ ॥ जैसा सर्प वेंचितां मुखीं । उलथापालथा होय दुःखीं । की पुत्रनिधनाचिया शोकीं । माता जेवीं तळमळी. ॥ १२६ ॥ तयापरी आक्रंदमान । चहूंकडे शब्दाचे ठाण । रथी विरथी छिन्नभिन्न । खंड स्पंदन ढेसळे. ॥ १२७ ॥ शैलशिखरातळीं धोंडी । पडती तैश गजाच्या कोडी । शृंडेविरहित धांवती प्रौढी । फोडिती व बीभत्स. ॥ १२८ ॥ अमोल्य वारु जैवागळे । छिन्नगात्री पडिले शिळे । शस्त्रे भूषणे रुचिरकीळे । ध्वज पताको प्रतापें. ॥ १२९ ॥ रौद्र रण भयंकर घोर । भूतगणा आल्हाद थोर । झोंबोनी कंठीं प्राशिती रुधिर । भेदिती हर्षे मांसाते. ॥ १३० ॥ वीरश्रियेचा अति उल्हास । वीर न पावोनियां त्रास । शर वर्षांनी बहु कर्कश । एकमेकां ताडिती. ॥ १३१ ॥ रुधिरनदीचा संगम । वैरुणालया लोटतां भीम । वीर न पवता संग्रामश्रम । महामारी पेटले. ॥ १३२ ॥ तव अस्ताचळा आक्रमी तरणी । लोहित भरिल्या दिशा गगनीं । पद्मिणी कोमाइल्या वदनीं । वियोगदुःखें पैंतीच्या. ॥ १३३ ॥ असो; आवरूनी । द्धासी । अर्जुन निघाला शिबिरासी । धर्मराज वीमांदेसी । पिटोनी भेरी चालिला. ॥ १३४ । सात्यकी भूप धृष्टद्युम्न । स्तवितां पार्थ गौल्यतामान । विजयश्रीचा आनंदघन । पावते जाले स्वस्थाना. ॥ १३५ ॥ दुर्योधनादि वीरश्रेणी । वेष्टित द्रोण विगतकिरणी । वस्त्रालया पातले झणी । जेवीं निधान हरपल्या. ॥ १३६ ॥ असो. धर्मराज रणदीक्षित । चातुर्मास हवनीं उदित । मृत्युकुंडीं काळाग्नि प्रदीप्त । इंधना आयुष्य नेमिलें. ॥ १३७ ॥ शुचि वा , हातघाईवर येऊन, हातपिटीस येऊन. २. कण्हती. ३. अत्यंत वेगवान्. ४. कठिण. तीक्ष्ण, ‘कर्कशं कठिनं क्रूरं कठोरम्' इति अमरः । ५. समुद्रास. ६. कोमेजल्या, म्लान झाल्या. . सयच्या. ८. वीरसमुदायांसह. ९. येथे मूळांतील बत्तिसावा अध्याय संपतो. १०, तंबंत. ११. नुवा=यज्ञांत आहुति देण्याची पळी.