पान:महाभारत.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ नरहरिकृत [द्रोणपर्व । त्वरा । शिर उडवूनी पाडिले परा। डें रथाचा सोडूनी थारा । महीवरी आतलें. ॥ १०२ ॥ कौरववीर कासावीस । होवोनी तिघे लोटले सरिसे । पाठी वीर मिनतां रोपें । क्रोध भीमा नावरे. ॥ १०३ ॥ संगीं वीर निबिड थाटा। लोटुनी केली बाणवृष्टी । तीन पंचक शर नेटीं । एकएको ताडिले. ॥ १०४ ॥ विगत करुनी तयासी । कर्ण वोढिला चहूं पाशीं । रविनंदन प्रतापराशी ।। अचळ शैलासारिखा. ॥ १०५ ।। निवारूनी वीरसंधान । धृष्टद्युम्नाते दाह। बाण । अर्पोनी सूतवाजिप्राण । पांच पांच शरीं घेतले. ॥ १०६ ॥ भूमी आतला पांचाळपती । बृहत्क्षेत्र बृहच्छक्ती । धांवतां कर्णे विगतगती । करुनी क्षणीं भ्रष्टिला. ॥ १०७ ॥ रोपें संतप्त धृष्टद्युम्न । अन्य रथीं वळंघोनी त्राणे । चाप कर्पोनी महाज्वलीन । बाणकोटी सोडिल्या. ॥ १०८ ॥ कणे वीरांचा मुगुटमणी । शर खंडुनी पाडिले धरणी । सत्याहत्तर इषु काळमानी । भेदुनी धनु खंडिलें. ॥ १०९ ॥ सिंहरवें फोडितां हाक । पार्षदा रोष अधिकाधिक । अन्य चाप कर्षांनी सतीख । बाण गुणीं लाविले. ॥ ११० ॥ मंत्रप्रयोग जपोनी वदनीं । सोडितां चौसष्ट जाले किरणी । जाणों चौसष्ट योगिणी रणीं । साह्य जाल्या पार्षदा. ॥ १११ ॥ सुसाट येतां प्रभिन्न घायीं । वारितां कर्णे भेदिला हृदयीं । मुष्टिपासाव कार्मुक मही । छेदोनियां पाडिलें. ॥ ११२ ॥ त्यांवर अनुसंधान । तीन शर अर्पिले ज्वलीन । जाणोनी गुण व्यापिले जन । बाहुउरीं शिरकले. ॥ ११३ ॥ कर्ण अचळ उभा कदनीं । दुर्योधन लक्षुनी नयनीं । द्रोणासहित वीरश्रेणी । जयद्रथ पातला. ॥११४।। पदाति, अश्व, नाग,रथी । वेष्टुनी कर्णा दाटिले क्षिती । रोजें वर्षती शस्त्रघाती । द्वंद्व निकरें पेटलें. ॥ ११५ ।। पांडववीरीं त्यांचा यावा । पाहोनी लोटले रथ हावा । अर्जुनवीर समानमघवा । विजयरथीं लोटला. ॥ ११६ ॥ धृष्टद्युम्न भीमसेन । सहदेव आणि अभिमन्य । नकुळ सात्यकीआदि घन । वीरमांदी तगटले. ॥ ११७ ॥ उभयसेनेचा एकवळा । घोषं व्यापिला नभोमंडळा । दिशा कोंदाटलिया सकळा । खणखणाट शस्त्रांचा. ॥ ११८ ॥ पती न विचारोनी आपुले आधीं । धांवोनी गज ताडिती क्रोधी । रथी वारण लोटोनी संधी । पदातिया मर्दिली. ॥ ११९ ॥ अश्वार उसळोनी रथी नागा । ताडिती १. धडाने. २. (रथांतून) जमिनीवर उतरला. ३. अत्यंत बलवान्. ४ सिहरव=सिंहनाद, युद्धध्वनि, वीरांची गर्जना. वीरां मुखींचे विकट शब्द । या नांव बोलिजे सिंहनाद ।। [मुक्तेश्वर आदिपर्व, अ० २९।६९]. ५. सूर्य. ६. देवताविशेष. ह्यांची पूजा भाद्रपदांतील अमावास्येच दिवशीं करितात. ७. हत्ती. ८. चाल, हल्ला. ९. स्वार.