पान:महाभारत.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अध्याय महाभारत. ६१ मिसळला. ॥ ८३ ॥ गांडीव कर्पोनी आकर्ण । शर सोडिले महाज्वलीन । जाणों आकाशा लागला अग्न । देवगण भयभीत. ॥ ८४ ॥ वारियाऐसे फिरती बाण । तटतटां शिरें पाडिती त्राण । महाद्विरद प्रभिन्न घन । शैलमान कोसळती. ॥ ८५ ॥ लहरीवेगें तळपती वारू । दुधड होवोनी पडती । स्थिरू । रथी विरथी सोडुनी धीरू । कर्णापाठी निघाले. ॥ ८६ ॥ चहूंकडूनी एक हाक । घाबिरे तेणें वीरनायक । कर्ण प्रतापाचा अर्क । उदय करी तयाते. ।। ८७ ॥ ‘ना भी, न भी' म्हणूनी सर्वां । रथ लोटिला पुढे बरवा ।। विशाळ बाणें मेहाहवा । पांडवी सेना छादिली. ॥ ८८ ॥ अस्त्रप्रभव मंत्रसिद्धी । शरमय जाली धरा संधी । विगत वीर काळक्रोधी । छिन्न जाले स्वगात्रे. ॥ ८९ ।। खळबळिले चमूभार । भीमा नावरे क्रोधभर । उसळला जैसा वैश्वानर । क्षयालागीं क्षयांतीं. ॥ ९० ॥ सवें वीर महाज्वलीन । सायकी आणि धृष्टद्युम्न । धनुष्य कर्पोनी आकर्ण । बाणजाळीं वर्षले. ॥ ९१ ॥ क्षयाअंतीं शनि, अंगार, गुरु, । तैसा भाली घोर प्रचुरु । मुखीं विखार स्फुलिंगभारु । सरसराट तेजस्वी. ॥ ९२ ।। बाणजाळीं प्रतापी कर्ण । आच्छादिले न दिसे ठाण । किंचित क्रोधं रविनंदन । कार्मुक पाणीं कर्षिलें. ॥ ९३ ।। अस्वप्रयोग करुनी त्वरा । बाण सोडिले कुलिशधारा । पार्थ शरवृष्टी करूनी परा । दिशा दाही झांकिल्या. ॥ ९४ ॥ हस्तलाघव शमित कोप। त्रिवर्गाचीं छेदिलीं चाप । शर खडतरूनी अग्निरोप । त्रिवर्ग रक्तीं भरियेले. ॥ ९५ ।। रोपें पावोनी भीमसेन । शक्ति सोडी महाज्वलीन । अट्टाहास्य फोडूनी वदन । दिशा तेजें डवरिल्या. ॥ ९६ ॥ जाणों काळसर्पाची भगिनी । सुसाट देखिली नयनीं । त्वरा करूनी शरसंधानीं । तीव्र शर सोडिले. ॥९७॥ त्रिखंड करुनी तीन तुकडे । मही पाडिले शीघ्र देहुडे । शर विंधोनी महाकुडे । तीन तीन तिघां ताडिले. ॥ ९८ ॥ सिंहरवे फोडुनी हाक । पार्थाप्रती धसला देख । क्रोधऊर्मी बाण सतीख । तयालागीं अर्पिले. ॥ ९९ ॥ फाल्गुन वीर धनुर्वाडा । रथ लोटुनी जाहला पुढा । काळविखारी तीक्ष्ण दाढा । सात बाण अर्पिले. ॥ १०० ॥ शत्रुजय शत्रुघाती । कर्णसुत रुचिरकांती । देखोनी अर्जुने दोषावर्ती । षट् बाण सोडिले. ॥ १०१ ॥ वोढोनी गांडीव सोडिलें । १. भिऊ नको, भिऊ नका. २. भयंकर युद्धांत. ३. त्या संधीस, त्या वेळीं. ४. प्रळयकाळीं. ५. मंगळ. याची कांति निखान्यासारखी लाल आहे. ६. भल्लसंज्ञक बाण. ७. स्फुलिंग= विस्तवाची ठिणगी. ८. स्थान, रणभूमी. ९. वज्रासारखी कठिण व तीक्ष्ण धार ज्यांची असे. १०. वांकडेतिकडे.