पान:महाभारत.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ ६४ ।। धर्मराज कुरुनंदन । सहित वीर वर्षती बाण । जाणों अंगारवृष्टी पर्जन्य । एकधारा लागली. ॥ ६५ ।। क्रोधे संरब्धे द्रोणाचार्य । शर वर्षांनी अप्रमेयै । चैद्य, पांचाळ, पांडववर्य, । त्रासोनी सेना मर्दिले. ॥६६॥ विगतमान चमूमांदी । क्लेश पावले वीरसंधी । किलकिलाट घोर शब्दीं । सेनामेळीं माजला. ॥ ६७ ॥ येरीकडे प्रतापी पार्थ । वीरवर्य रणपंडित । धनुभृताचे मूर्ध्नि श्वेत । पताक मिरवे जयाची. ॥ ६८ ॥ तो अर्जुन वीर धनुर्वाडा । काळही येऊं न सके पुढा । त्रिगर्त सैन्याचा जंबडा । वस्ती काळा वोपिल्या. ॥ ६९ ॥ संशप्तक दानव सुर । बाणी त्रासोनी केले स्थिर । धडमुंडांकित हैत्यवीर । अमित रणीं पाडिले. ॥ ७० ॥ गजाश्वरथी पदाति वीर । मर्दानी । सकळ केले चूर । जैसे धान्यकांड शूद्र सरे । कंडण करी ज्यापरी; ॥ ७१ ॥ तयापरी मर्दानी सैन्या । निघता जाहला प्रतापराणा । विचित्र वाद्यघोष नाना। व्योमालागीं चुंबिले. ॥ ७२ ॥ जैसा अग्नि लागोनी गेहीं । उसळोनी पुढां चालिला तेही । कीं नदीपूर भरूनी डोहीं । सागराते फुफाटे; ॥ ७३ ॥ ना ते रामचंद्रे खरदूषणा । मर्दानी पातला दशानना । कीं तो भार्गव सहस्रार्जुना । जिंकोनी क्षत्रियां मारिलें; ॥ ७४ ॥ तयापरी संशप्तकां । विगत करुनी, द्रोणा निका । पावता जाला [तवका] । विजयश्रीये प्रतापें. ॥ ७५ ॥ विशाळ रथू वानरध्वजु । तप्त हाटक तेजःपुंजू । पताका डळमळे जैसी विजू । वाजी वात हेळिती. ॥ ७६ ।। 'सर' म्हणत, ‘मंदटा! परा । अडचणीं गुंतसी, पाहे थारा । मना! तू विकळ कामातुरा । स्त्रीकुचाग्रा अडखळसी. ।। ७७ ।। अनेक तुझ्या विचित्र [धांवा] । आमुते मार्गे करिसी गोवा' । वदोनी ऐसे उसळोनी हावा । द्रोणानीका पातले. ॥ ७८ ॥ जैसा पूर्वे प्रकाशतां हेळी । उलूक माना घालिती तळीं । की चंद्रबिंब प्रकाशतां कीळीं । तस्कर होती घाबिरे; ॥ ७९ ॥ ना तो जारकर्मी दुराचारी । देखतां जना भयविकारी । ना तो कोलिनँ मार्ग अघोरी । पाहतां, पवित्रा लाजिजे; ॥ ८० ॥ तयापरी सव्यसाची । देखतां, असुरां अरुची । पांडवसेना आनंदाची । वृष्टी करी उल्हासें. ॥ ८१ ॥ जेवी गंत पंती पाहतां सती । आनंदाची भरी जगती । की प्रिय वस्तु जाहलिया प्राप्ती । चित्तीं चिंता मावळे; ॥ ८२ ॥ हर्षयुक्त तैसी सेना । मिनली पार्था, विक्रम दुणा । फाल्गुन प्रतापाचा राणा । सेनामारी १. अग्निवृष्टि. २. तप्त, व्याकुळ. ३ असंख्य. ४ समुदाय. ५. यथेच्छ, पुष्कळ. ६. उपहास करिती, जिकिती, मागे टाकिती, ७. शक्युपासक, शाक्त. ८. प्रवासास गेलेला नवरा. ९. भरती,