पान:महाभारत.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अध्याय महाभरिते. ५९ यातें त्यागोनी. ॥ ४५ ॥ अंकुश स्पशनी माथे । हस्तिप हस्तिपा ताडिती व्यथे। अश्वारोह अश्वरातें । थडकोनियां हाणिती. ॥ ४६॥ पदाती पदातिया थोर हाव । भिडुनी रणीं हाणिती घाव । रथी रथिया शरलाघव । थडकोनियां दाविती. ॥ १७ ॥ चतुरंग सेनांग एकत्र लोटी । मिळोनी करिती शत्रवृष्टी । आपपर नोळखोनी दृष्टी । करिती घात निघाते. ॥ ४८ ॥ म्हणे ‘मारा, घ्या, घ्या' शब्द । सकळां मुखीं हाची विशद । शस्त्रखणखणी विविधभेद । रणमंडळीं माजला. ॥ ४९ ॥ हस्तिप हस्तिपा घालितां घाव । गज गजा पुसिला ठाव । छिन्नगात्री फोडिती रव । आर्द्र भेरीसारिखे. ॥ ५० ॥ एक जर्जर झाले घायीं । एक उभे ठाईच्या ठायीं । पडिले, पाय नुचले कांहीं । सर्वांग क्षते व्यापिलें. ॥ ५१ ॥ एकांच्या तुटोनियां माना । नुसंधे धडपडती रणा । गुंडाविरहित वस्त्राभरणा । विहीनपाद खोडिती. ॥ ५२ ॥ चरणाविरहित कोधेळ एक । नुसंधे रणीं पडिले देख । राऊत राणे नामानिक । येरयेरा हाणिती. ॥ ५३ ॥ एकमेकांचे घायीं । अशिरी होउनी पडती मही । अश्वललाम विचित्र तेही । खंडूनि शस्त्रे पडियलें. ॥ ५४ ॥ रथिया रथी लोटुनी सैरा । शरीं शरांच्या वर्षती धारा । खंडविखंड गात्रीं पुरा । येरयेरा टाकिती. ॥ ५५ ॥ चतुरंग एकत्र धसती । मिनले विसरले देहस्मृती । फावल्या ठायीं वीरांप्रती । वीरश्रीनेटें ताडिती. ॥ ५६ ॥ पति गजाचे घालिती घाव । राऊत रथिया घेती धांव । योग्यायोग्य विसरूनी सर्व । रणधुमाळी मिनले. ॥ ५७ ॥ चतुरंग सेनेची कलेवरें । मही दाटली निबिड सैर । ध्वजा, पताका, शस्त्रे तीव्र । विचित्र धुळी मेळविती. ॥ ५८ ॥ मुगुट, कुंडलें, वनमाळा, । बाहुभूषणे, कटिमेखळा, । गजाश्वभूषण कीळा । भूषित धरा भूषणीं. ॥ ५९॥ आँस्त्रसंपात वर्षे वन्ही । वीरां खळबळ घोर रणीं । भ्याड निघाले मागिले चरणीं । आप्तवग त्यागोनी. ॥ ६० ॥ पुत्र पित्याची सोडुनी आशा । पळतां, येरू करी घोषा । न गणोनी म्हणे, ‘जीर्णयसा । किती दिवस ठेवणे ? ॥ ६१ ॥ असा सेनेचा वीरक्षय । उभयदळीं जाहला वय । द्रोण प्रतापाचा सूर्य । बाणकिरणी उसळला. ॥ ६२ ॥ किरणप्राय शोभाभरित । वेष्टित वीर अमित शत । द्रौणी, कृप ऐश्वर्यमंत । रविनंदन प्रतापी. ।। ६३॥ वीरमांदीसी जयद्रथ । विंदानुविंद मद्रनाथ । शरजाळीं वर्षांनी त्वरित । वीरवीर त्रासिले १. खोडासारखे जख्खड होऊन पडतात. २. कोथळ, पोते. ३. नामांकित. ४. हि ५. अश्वभूषण, उत्तम घोडा. ६. शस्त्रांचे एकमेकांवर आपटणे, to ८. श्रेष्ठ, मोठा. एकमेकांवर आपटणे. ७. म्हातान्यास.