पान:महाभारत.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ नरहरिकृत [द्रोणपर्व जयभेरीच्या बोभाटीं । जयवाजंत्री लागली. ॥ २७ ॥ हताहत करूनियां सेना । पार्थ दक्षिणे पातला रणा । वीर मिनले रणकंदना । अर्जुनाप्रती निघाते. ॥ २८ ॥ दुर्योधन सहितद्रोण । धर्मराजा तगटले त्राण । उभय वीरांची मिठी घन । महा थोर माजली. ॥ २९ ॥ भीमसेन सायकी रणा । पावतां, पार्षद आपुली सेना । तिरस्कारुनी, रणांगणा । द्रोणाचार्या झगटला. ॥ ३० ॥ उभयवीरांची घोर मिठी । बाणजाळी भरली सृष्टी । धडधडा वीर पडती पाठी । ताळफळासारिखे. ॥ ३१ ॥ अश्वत्थामा रोषावर्ती । पुढारुनी नीळराजाप्रती । म्हणे, ‘माते युद्ध करीं, शक्ती । इतरां केवीं मानसी ?' ॥ ३२ ॥ ऐकतां क्षणीं उसळोनी नीळ । बाणीं वर्षला तीव्र हेळ । अकंप द्रौणी शैल अचळ । क्रोधानळी धडकला. ॥ ३३ ॥ कामुकीं सज्जोनी तीक्ष्ण भाली । ध्वज, धनु, छत्र पाडिलें तळीं । पद्मकाया रुचिरकीळी । पद्मनेत्र कर्णान्त. ॥ ३४ ॥ सकुंडल शिर नागर पाहीं । छेदोनी पाडिलें कोमळ मही । पांचाळ मारिला एके घायीं । पृषददळी आकांतू. ॥ ३५ ॥ भीमसेन पातला कैवारा । तव पुढां लोटला मुख्य धुरा । द्रोणाचार्य करुनी त्वरा । शतबाण भीमा अर्पिले. ॥ ३६॥ त्यांवर आणीक काळक्रोधी । ताडितां सदुसष्ट बाण वर्मसंधी । [भीमसेन] न पवतां आधी । कर्णे बारा विधिले. ॥ ३७॥ काळदंडासमान प्रतिमा । सत्तर अप अश्वत्थामा । दुर्योधने धरूनी नेमा । सहा अर्पिले निघालें. ॥३८॥ भीम भीमपुरुषार्थी घन। न कंपत रोपें जाला ज्वलीन । जैसीं संक्रमणाची वाणं । घेवोनी पुन्हा देइजे. ॥३९॥ तयापरी वृकोदर । करी सकळां पहुणेर । द्रोण प्रतापी महावीर । गुरुवर्य भूलोकीं. ॥४०॥ पांच शत शर विखारी । काळपुष्पमाळेची सरी । अर्पोनी गुरूतें तूर्ण समरीं । दाहा बाणीं विधिला. ॥ ४१ ॥ दाहा बाण अहीसमान ऊँ । दुर्योधना ताडिले वर्मी । अश्वत्थामा नैठिंककर्मी । आठ बाणीं विधिला. ॥ ४२ ॥ भीमसेनें प्रभिन्न बाणीं । सत्यजित पाडिला धरणी । कौरववीर लोटले रणीं । किलकिलाट शब्दांचा. ॥ ४३ ॥ ऐकोनी घाबिरा युधिष्ठिर । प्रेरिले भूप प्रतापशूर । सायकी आणि माद्रीकुमर । भीमापाठीं थडकले. ॥ ४४ ॥ उभय चमूचा एकवळा । जाला, तुंबळ फोडिती कीळा । वीरवीरांतें ताडिती सकळा । मृत्युभ । १. त्राणे, मोठ्या आवेशाने. २. भल्लनामक बाण. ३. सुंदर. ४. साहाय्यार्थ. ५. पाहुणचार, आदरातिथ्य. ६. त्वरेनें, झटपट, ७. जळफळीने, तडफडीनं. ८. एकनिष्ठपणे गुरूची सेवा करणारा, ब्रह्मचारी.९.आरोळ्या. किळा=कील, गुडगुडींतील पाण्याचा जो आवाज ( hubble bubble) होतो तो.