पान:महाभारत.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अध्याय महाभारत, ५७ डिले नाना प्रौढी । फाल्गुनें तोडुनी कांडोकांडीं । भ्रष्ट केले क्षणार्धे. ॥ १० ॥ गांडीव सज्जोनी शर तीक्ष्ण । सोडिले दारुण फणिमान । पांच शरें शशांकवदन । धरणीवरी पाडिले. ॥ ११ ॥ ‘आहा !' शब्द पृतनामुखीं । निघाले वीर राहिले बाकी । रथ लोटूनी सौबळ शोकीं । रोपें पार्था तगटला. ॥ १२ ॥ अँभिचारअस्त्र सज्जोनी होट । बाण सोडिला अॅभिन्न नेट। मोह पावला जगजेठी । आत्माराम श्रीकृष्ण. ॥ १३ ॥ विद्याप्रभाव विचित्र कळा । शस्त्रे प्रसवली नानाकळा । शूळ, पट्टे, गदा, अर्गळा, । लेडी, चक्र, टोणपे, ॥ १४ ॥ त्रिशूळ, कोयत्या, धोंडे, फरश, । शैतन्नी, परिघ, आणि पाश । नानाविध शर,कर्कश, । वत्सदंत, गृध्रपुखी. ॥ १५ ॥ जाणों आभाळ फुटलें शस्त्रीं । तेसी शस्त्रे वर्षती धात्री । अनेक श्वापदें क्रूर वक्रीं । भक्षं पार्था धांवलीं. ॥ १६ ॥ खरोष्ट्रमहिषसिंहव्याघ्र-। चमरचिलिकावृक उग्र । श्वाने, गीधादि पातले शीघ्र । भुयी माती उकरिती. ॥ १७ ॥ अनेक भूतांच्या हाडळी । विकट तुडे, बीभत्स कीळी । क्रूर राक्षस धांवती सँळीं । भेडसाविती उडोन. ॥ १८ ॥ भूतबाधा कृतांतकाळा । शीते : बाधिजे वन्हिज्वाळा । उष्णे उकांडा हिमाचळा । श्रांत गंगा जीवनार्थी १ ॥ १९ ॥ रवीआड खवळे अंधारी । गरुड चांचरे विषलहरी । शेष डळमळी घराभारीं । हें कैसेनी घडेल ? ॥ २० ॥ तयापरी विजयी पार्थ । निर्भय चित्तीं हर्षयुक्त । दिव्यास्त्र प्रेरुनी त्वरित । नाहींच केलीं क्षणावें. ॥ २१ ॥ अभिचारअस्त्र जातां वृथा । सौबळे रोपें चुरूनी हस्ता । तमांधअत्र, सोडिलें तथा । दिशा काजळे बुजाल्या. ॥२२॥ निबिड अंधार प्रभिन्न कोडी । जाणों काळपुरुषाची घोंगडी । दिशा पांडुरली महा कुडी । क्षया सर्वां न्यावया. ॥२३॥ पार्थ प्रतापाचा हेळी । आदित्यास्त्र प्रेरिलें कीळी । तम मेळविले सर्व धुळी । जेवीं पायें हरिनामें. ॥ २४ ॥ शर वर्षोन घनदाट । बाणीं शरीर जालें। कैट । सिौबल प्रतापी वीर उद्भट]। केंट होवोनी पळाला. ॥२५॥ पुढा लोटतां कौरववीरा । पार्थं शरांच्या वर्षांनी गारा । वीर वीर खोंचले सैरा । रक्तधारा सर्वांगीं. ॥ २६ ॥ विगतमान वीरभय पोटीं । धांवोनी निघाले द्रोणापाठीं । १, सर्पसारखे. २. पृतना=सैन्य. ३. दुस-याचा नाश करणारे अस्त्र. ४. मोट्या नेटाने ५. लहडी-लोहांगी, लोखंडाची काठी. टोणपा=दोडके, नोटा. ६. तोफा. ७. चिल्लिका-चिल बंगुर, . छळ करण्याच्या उद्देशाने. सळ-छळ. ९. पाण्यासाठी. १०. सूर्य. ११ डोंगर, पर्वत, १२. चूर्ण, पीठ.. १ न० द्रो