पान:महाभारत.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ ११५ । कुरुवर्यराज दुर्योधन । उसळला क्रोधे ज्वेलिन । सवें वीरांचे समूहो पूर्ण । दावानळासारिखे. ॥ ११६ ॥ असो; पुढां युद्ध गहन । कृतांतकाळ खवळला पूर्ण । वीररसाचे रसायण । पान सज्जनीं करावें. ॥ ११७ ॥ की ते वीररसाची प्रमदा बाळा । भीष्मपर्वी वरिली हेळा । तारुण्यभरें भोगार्थ कीळा । द्रोणपर्वी मुसमुसी. ॥ ११८ ॥ तिचिया गुणा लुब्धोनी श्रोते । कदा श्रोत्र न करिती परते । नाम ऐकतां धांवती तेथे । अत्यादरें आपसया. ॥ ११९ ॥ जेवीं हरीची जारमारचोरी । ऐकता पावे स्वर्गी थोरी । तेवीं भारतकथेची थोरी । पुण्या मेरु ठेंगणा. ॥ १२० ।। श्रीगुरु भीमराज वर्षाकाळ । कृपाजलद करितां ढाळ । नरहरी मोरेश्वर मैहिमोल । कथाअंकुर उसळे. ।। १२१ ॥ अध्याय आठवा. संजय म्हणे, ‘राजसत्तमा ! । भगदत्त गेलिया यमधामा । वीर खळबळोनी क्रोधगरिमा । अर्जुनाप्रती धांवले. ॥ १ ॥ सेनाअग्रीं सौबळ शकुनी-। सहित स्वचमू पुत्र गुणी । धडकला प्रतापअग्नी । श्लाघा वानीत मुखाब्जीं. ॥ २॥ गांधारसुत पर पुरंजय । आणि वृषकेत संग्रामजयें । लोटुनी विक्रम पृथातनयें । बाणजाळीं ताडिला. ॥ ३ ॥ न गणोनी पार्थे करुनी त्वरा । वप्रकेत शरीं केला घाबिरा । सूत, वाजी, ध्वज, छत्रधारा, । छेदोनी बाणीं पाडिला. ॥ ४ ॥ चाप खंडूनी पाडिले धरणी । शकुनी विंधिला शतबाणीं । शरें त्रासितां अनीकिनी । पुन्हा युद्ध झगटलें. ॥ ५ ॥ चकडनी शत्रवृष्टी । करिती पार्था प्रतापनेटीं । फाल्गुनें न लगतां त्रुटी । बाणशक्ती सोडिली. ॥ ६ ॥ पांच शत गांधारवीर । खंडूनी पाडिले महीवर | परी न सरोनी पैरा वीर । घालिती उड्या मृत्युकुंडीं. ॥ ७ ॥ शकुनीतनय पांचजण । महाप्रतापी जैसे ज्वलिन । वृष, कच, लोम, महात्मा, जाण । राजनुशले पांचंवा. ॥ ८ ॥ थडकोनियां अर्जुनासी । करिती युद्ध महारोषीं । जेवीं ईद वृत्रासुरासी । भिडे पूर्वी ज्यापरी. ॥ ९ ॥ पांचजणी कडोविकॅडी । शर सो । १. येथे मूळांतील अध्याय एकुणतिसावा समाप्त झाला. २. सहज, लीलेनें. ३, तेज, सौंदर्य. ४, अभिषेक, वर्षाव. ५. पृथ्वीसारखा. ६. ह्या गांधारसुतांची नांवें ‘वृषक' व अचल' अशी होतीं. ७. सैन्य, ८, चिटकी, क्षण. ९. पलीकडे, दूर. १०. हीं शकुनिपुत्रांची नांवे मुळांत सांगितलेली नाहींत. ११. युक्तिप्रयुक्तीने किंवा कडाक्याने.