पान:महाभारत.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ अध्याय महाभारत, ५५ हिली उभी । सहस्र वर्ष लोटतां नाभी । नाभी' म्हणे जगदात्मा. ॥ ९८ ॥ ‘इच्छित अर्थ करीन पूर्ण । माग वर न करीं शीण'. । येरें वंदोनी श्रीचरण । मनकामना निवेदी. ॥ ९९ ॥ “मानवदैत्यराक्षससुरा । सर्वी जयस्वी करी कुमरा' । हरी तोषोनी ज्वलितधारा । अंकुश पाणीं अर्पिला. ॥ १०० ॥ म्हणे, हे माझे वैष्णवी अस्त्र । असतां हस्ती, न बाधी शस्त्र । यतें रक्षितां कुबेरमित्र । घात सर्वथा करील. ॥ १०१ ॥ सँबीजवर्ण मंत्रदेवता । अपनी अदृश्य जाहला धूर्ता ! । पुढे नरकासुर अन्यायपंथा। पावतां अच्युते मर्दिला. ॥ १०२ ॥ ते अत्र ठेवा धराउदरीं । गुप्त होतां बहुकाळवरी । इंद्रमित्रत्व राजया करीं । भगदत्तासी लाधलें. ॥ १०३ ।। तें रौद्र अस्त्र विश्वभक्षक । माझे म्यांची साहिलें देख । तया निवारण आणिक । समर्थ नाहीं मजवीण. ॥ १०४ ॥ ऐसें वदोनी दानवारी । बुजाविला पार्थ समरीं। ‘भूपशक्तीची केली बोहरी । आतां वधीं अविलंबे.' ॥ १०५ ॥ भगदत्त क्रोधवर्धन । शत बाण सोडिले महाज्वलिन । असंभ्रांत सुभद्रारमणे । खंडूनी मध्ये टाकिले. ॥ १०६ ।। गांडीव कर्पोनी आकर्ण । नाराच सोडिले महा कठिण । करींद्रकुंभ विदार्यमाण । करूनी मही शिरकले. ॥ १०७ ॥ जैसे व्याळ वारुळबिळीं । निघती तैसे शिरकले भाली । द्विरदें फोडूनि घोर आरोळी । सो डुनी प्राण रिचवला. ॥ १०८ ॥ जेवीं वज्रघातें शैलशिखर । खचोनी पड़े। अवनीवर । की झंझावातें महातरुवर । सेवी धरा ज्यापरी. ॥ १०९ ॥ जैसा पडतां प्रैभिन्न हस्ती । दाशार्ह बोले, अर्जुनाप्रती । “भूप उपनेत्र दिव्य कांती । असतां नेत्रीं अवध्य. ॥ ११० ॥ सोडुनी बाण फोडी पुरता । मग सुखें करी भूपाच्या घाता.' । ऐके तत्क्षणीं अर्जुने तथा । उपनेत्र ते भंगिलें.॥ १११ ।। अर्धचंद्र नतपर्वणी । काळदंड अग्निवर्णी । शर सज्जोनी शरासनीं । कर्पोनी बाह्या सोडिला. ॥ ११२ । उसळोनी अशनीलोटी । येउनी बैसला भए. कठीं । शिर उडालें गगनपोटीं । मुरडोनी धरा पिटिली. ॥ ११३ ॥ तालव कुठारवायीं । छेदी धस उभारे मही । कीं नखाग्रीं पद्म खुडितां पाही । नलिनी नुसंधे ज्यापरी. ॥ ११४ ॥ तेवीं नृपशिर पडतां तळीं । पांडववीरां वाहिल्या टाळी । विजयी जाहला किरीटमाळी । कौरवदळीं आकांतु. १. भिऊ नको. २. शंकर. ३. मंत्राक्षरांसह. ४. समजाविला. ५. भस्म, नाश, १ . मस्तकांत. ७. मोठा. ८. कृष्ण. ९. भगदत्त आपल्या डोळ्यांस त्रास होऊ नये म्हणन । प्रकारचे पातळ फडके डोळ्यांस बांधीत असे—असे मूळांत आहे. १०. ज्याची पेरें वांकदार आहेत असा. ११. वज्राप्रमाणे दणका देणारा. १२. सांधत नाही, पहिल्याप्रमाणे होऊ शकत नाही