पान:महाभारत.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ नरहरिकृत [द्रोणपर्व करिती कांहीं । की सैर होवोनियां मही । धान्यउठावा नव्हेची. ॥ ८० ॥ तयापरी नरेंद्रकाज । न करीच बळिष्ठ गजराज । क्षतें विगत जालें तेज । रोष भूपा नावरे. ॥ ८१ । निर्वाण अंकुश विश्वघाती । वैष्णवी अस्त्र ज्वलितकांती । प्रेरिता जाहला अर्जुनाप्रती । महाक्रोधे निघाते. ॥ ८२ ।। सहस्रविजांचा एकवळा । कडाडल्या अग्निज्वाळा । प्रदीप्त दिशा जाहल्या सकळा । वीरदृष्टी लोपिल्या. ॥ ८३ ॥ प्रळयकाळाचियेसरी । सुसाट पातला अर्जुनावरी । भक्तवत्सल कृपाळु हरी । कौशल्यमल्ल कान्हया; ॥ ८४ ॥ फाल्गुन घालोनियां पाठी । दणका सोशिला हृदयपुटीं । वैजयंती माळा गोमटी ।। जाली कंठीं अस्त्रांची. ॥ ८५ ॥ तेणे शोभला सर्वेश्वर । जाणों घना दामिनीहार । कीं इंद्रधनुष्याचा फेर । संध्यारागा पातला. ॥ ८६ ॥ अतसीपुष्प । घनसांवळा । अर्ककिरण कमळमाळा । कीं ते धूम्रमंडित अग्निज्वाळा । शिखा । पीतांबर साजिरा. ॥ ८७ ।। ऐसिया शोभे जगज्जीवन । देखोनी केशव केशिदमन । हास्यवदन पृथानंदन । बोलता झाला हरीते. ॥८८॥ म्हणे, ‘माधवा ! रमारमणा!। दानवारी ! दरिद्रहरणा ! । भवध्येया! भवाब्धिभंजना !। दुरितदळणा ! त्रिमूर्ती ! ॥ ८९ ॥ विश्वंभरा ! विगताक्षा ! । धराधरा ! धरणीधीशा ! । परात्परा ! परमपुरुषा! । पुरुषोत्तमा ! पुरुषार्थी ! ॥ ९० ॥ नेम नेमिला तुवां वचनी दूरी ! । ॐ ‘मी न करीं समरीं' । याचे विस्मरण पडिलें दूरी । विनोद जगा होतसे. ॥ ९१ ॥ तूं जें करिसी शोभे तुज । परी माते येतसे थोर लाज । भूपअस्त्रांचे काय तेज ? । क्षण क्षीण करितों मी. ॥ ९२ ॥ मत्परुषार्थाची अंयनी । साहे वीर नाहीं धरणी । विदित असतां चक्रपाणी । किमर्थ अस्त्रा साहिले ??? ॥ ९३ ।। हांसोनी बोले मुरारि, शौरी । जगदाधीश, कृपाळु, हरी । मायानियंता, मधुकैटभारी । जनार्दन, विश्वात्मा. ॥ ९४ ॥ म्हणे. “पार्था ! पुरुषार्थिया ! । अस्त्रप्रभव ऐकिजे वया! । पूर्वी नरकासपत्राया। घरादेवी लाधली. ॥ ९५ ।। महाबळी तेज वर्चस । देखोनी सही पावली तोष । म्हणे, ‘यासी न बाधिजे विष । देवगंधर्वइंद्रांचे. ॥ ९६ ॥ सर्व अ. वध्य अमर सृष्टीं । होइजे' ऐसे कल्पोनी पोटीं । पुत्रस्नेह कवळोनी इट। धेरा तपी बैसली. ॥ ९७ ॥ दृष्टी लावोनियां ऊर्ध्व नभीं । वायु भक्षुनी रा १. सर=पावसाची सर. थोड्याशा पावसाने धान्य पिकण्यास योग्य अशी जमीन तयार होत नाहीं-हा इत्यर्थ. २. अतसीपुष्प=तागाचे फूल, ३. 'मी युद्ध करणार नाही, फक्त सारथ्यच करीन' अशी कृष्णाने प्रतिज्ञा केली होती. ४. चाल, सपाटा.