पान:महाभारत.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ अध्याय] महाभारत. ५३ शाईपाणी । चक्राकाररथ मुरडोनी । की फिरवितां वेगें चपळपाणी । गजमुसांड वारिली. ॥ ६१ ॥ विचित्र मंडळ नानाकळा । गती विगती उडवी हेळा। चतुरचतुरांचिया डोळां । आड झापडी येतसे. ।। ६२ ।। कोठे दिसे, कोटें न दिसे । सरकोनी परा धडके रोपें । गरगरां अश्व वारियासरिसे । भ्रमवी पाणिकौतुकें. ॥ ६३ ॥ दुःसह मानोनी भगदत्त । अयंत जाला रोपें तप्त । चाप कर्पोनी आकर्णान्त । प्रभिन्न शर सोडिले. ॥ ६४ ॥ शिळाशित तीक्ष्ण पुखी। सोडिले घोर महा तवकीं । अग्निस्फुलिंग सांडी मुखीं । तेजें धरा डळमळी. ॥ ६५ ॥ सुसाट उतरूनियां पाही । भेदुनी हरी ते विझाले मही। अर्जुन निमग्न खेदडोहीं । क्रोधानळी धडकला. ।। ६६ । काळदंड सोडूनी भाळी । चाप छेदोनी पाडिलें तळीं । परिवार मेळवूनियां धुळी । केली होळी सेनेची. ॥ ६७ ॥ क्रोधं भगदत्ते चुरूनी पाणी । चौदा तोमर सूर्यकिरणी । सोडितां अजुने द्विभागुनी । खंडुनी धरे पाडिले ॥ ६८ ॥ गांडीव वोढोनी कानाडी । शरजाळ सोडिले महाप्रौढी । जवर्म कॅरूनी देशधडी । सपिच्छ मौळीं शिरकले. ।। ६९ ॥ रुधिरस्राव जाला पुरा । जाणों पर्वतीं गळती धारा ।। मस्तक झाडूनी आर्तस्वरा । फोडिता जाला बीभत्स. ॥ ७० ॥ भूप प्रदीप्त रोषावर्ती । रुक्मदडे सोडिली शक्ती । जाणों दामिनी लोटली क्षिती । येतां पार्थे छेदिली. ॥ ७१ ॥ त्वरा करूनी शरासनीं । ध्वजछत्र खंडूनी पाडिलें धरणी । दश बाण अर्पिले राजमूर्ती । कंकपत्री हेमपंख. ॥ ७२ ॥ अधिकाधिक क्षोभला भूप । जैसा लत्ताप्रहारें विखारी सर्प । तोमर सोडिले काळताप । ज्यांचेनि पावे खेदाते. ॥ ७३ ॥ येउनी पडिले पार्थहया । येरी डोलली बलिष्ठ काया। पार्थे गांडीव कर्पोनी बाह्या । बाणीं मुगुट उडविला. ॥ ७४ । रोष नावरे प्राग्ज्योतिष । बाणीं ताडिलें हृषीकेशा । फाल्गुने करूनियां घोषा । तीक्ष्ण बाण सोडिले, ॥ ७५ ॥ कार्मुकतूणीर खंडुनी झणीं । द्विपीं सप्त बाण काळमानी । सोडनी तीव्र अग्निवर्णी । सर्वांग वर्मी भेदिले. ॥ ७६ ॥ जेवीं वर्मी ताडितां शब्दबाणीं । फॅळका उठे अंतःकरणीं । कीं भाडा भर्जित धान्यकुणी । तडफडा होय लाह्यांचा ।। ७७ ॥ तया रोष भगदत्त द्विरदा । प्रेरित भूमी न घाली पदा। शरीर जर्जर जालें विशदा । खेदमान शरघायीं. ॥ ७८ ॥ जैसी दरिद्रियाची कांता । कांतवचन करी वृथा । कीं वार्धक्य अंगा आततां । इंद्रिय सत्ता नायके ॥ ७९ ॥ अधिकार निघौनी गेल्या पाहीं । लोक नमस्कार में । 'वाचे बाण. ३. कानापर्यंत. ४. हत्तीचे मर्मस्थान १. साहाणेवर पाजविलेले. २. भली नांवाचे बाण. ३. कानापर्यंत. ४, ह भेदून. ५. वीज, ६. भगदत्तास. ७. भडका. ८. भटत किंवा तव्यावर. ९. पतीची आज्ञा.