पान:महाभारत.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होणपर्व ५२ नरहरिकृत बाणे । ध्वजधनुष्य खंडूनी त्राणे । पांच हट्टी बुडाले. ॥ ४४ ॥ त्रिगर्त बंधु साहा साहा बाणीं । ताडुनी सुत मारिले रणीं । सुशर्मा क्षोभोनी चौगुणी । उल्का वमी विषाच्या. ॥ ४५ ॥ भुजंगप्राय ऐसी शक्ती । सोडिली घोर फाल्गुनाप्रती । पांच तोमर कृतांतघाती । कृष्णावरी धाडिले. ॥ ४६ ॥ अस्त्रविद्येचा मुगुटमणी । पार्थं त्रिखंड केले तीं बाणीं । तोमर तोडुनी तत्क्षणीं । तुकडे धरे पाडिले । ४७ । शर वर्षांनी घनदाट । भवंडिला सेने थोर आट । जेवीं तृणातें हव्यवाटे । भ्रष्टी तैसा सर्वांतें.।। ४८॥ विगत करूनी सर्व सेना । निघता जाला प्रतापराणा। गरुडवेगें पावतां रणा । कौरवदळा खळबळी. ॥ १९ ॥ भगदत्तगजा निहँटी । भिडवी रथ कृष्णजगजेठी । पांडववीरां आल्हाद कोटी । धरातळीं न माय ॥ ५० ॥ जेवीं गंतपती पतिव्रता । देखतां, आनंद न मानी वैाता । कीं सीताशुद्धी आणितां हनुमंता । कपिदळा उत्साहो. ॥ ५१ ॥ ना तो फाल्गुन इंद्रगजव्रता । आणितां उल्हासे देवी पृथा । कीं कार्तवीर्य छळितां; रिजसुता । जेवीं राम येतां आनंदे. ॥ ५२ ॥ तयापरी पृतनातुष्टी । धांवोनी मिनली पार्थापाठी । फाल्गुनप्रताप जगजेठी । बाली मिठी भगदत्ता. ।। ५३ ।। कौरववीरांच्या चलथा । धांवोनी वर्षती शर पार्था । उभयवीरीं दाटितां रथा । गर्दी व्योमा उसळती. ॥ ५४ ॥ कौरववीर निबिड थाटी । वर्षती पार्था शरांच्या वृष्टी । वाजिवारणे अमित पाठी । ताडिती शस्त्र विचित्र. ॥ ५५ ॥ श्वेतवाहन रोषावर्ती । शर सोडूनी काळघाती । खंडविखंड शरांच्या पंक्ती । धरेवरी पाडिल्या. ॥ ५६ ॥ दाहा सहस्र वीर रथी । विगत केले न लवतां पातीं । जेवीं अनिळ धडकतां क्षिती। केवीं तृणकाष्ठा ? ॥ ५७ ।। करूनी रणाची बोहरी । लोटला भगदत्तद्विपावरी । तंव तो प्रतापगजकेसरी । करी धुमाळी सैन्याची. ॥ ५८ ॥ विजयी पार्थ लोटतां पुढा । भगदत्त चावोनियां दाढा । करींद्र प्रेरिलो गाढा । उसळला गोळा यंत्राचा ॥ ५९॥ घनप्रभिन्न गिरी । क्षते झरपती गेरुकसरी । मदें मस्तकावरी समरीं । सिंहप्राय धडकला. ॥ ६० ॥ श्रीकृष्ण १. झपाट्याने. २. अग्नि. ३. पाही. ४. प्रवासास गेलेला [परंतु आतां परत आलेला]- ५. कल्पित गोष्टी. अन्वयः-[ती] आनंद धाता न मानी (=कल्पित न गणी, खरा समजत, प्रत्यक्ष अनुभविते). धाता' शब्द रामदासांनी या अथीं योजिला आहेः-कथान्वय लापनिका । नामचा करतालिका | प्रसंगें बोलाव्या अनेका । धाता माता नेमस्त. ।। दासबोध ४।२।१०. ६. गजगार व्रतासाठीं. ७. रेणुका. ही क्षत्रियकन्या असून, जमदग्नीची पत्नी व परशुरामाची आई ८. भस्म, नाश. ९. गेरूप्रमाणे (रक्तवर्ण). -