पान:महाभारत.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ अध्याय] महाभारत. ५१ बीजोचारीं सोडिलें. ॥ २५ ॥ सहस्र विजांचा एकवळा । कीं वडवाझी उसळला ज्वाळा । ना ते भर्गनेत्रींची ज्वाळा । उदित जाली क्षयाते. ॥ २६ ॥ तयापरी सुसाट बाण । धरा तेजें भरली पूर्ण । दैत्येंद्रशराचे तीव्र ठाण । जळोनी जालें कोळसा. ॥ २७ ॥ अस्त्रप्रभव सहस्रशा । प्रसवोनी बाण करिती वळसा । तटतटां शिरें धरणीकोशा । खंडूनियां रिचवती. ॥ २८ ॥ गजाश्वपदातिमहारथी । खंडूनी शवें दाटली क्षिती । वस्त्रे भूषणे प्रदीप्त कांती । धरा भारें ढेसँली. ॥ २९ ॥ जिकडे तिकडे फिरती बाण । शरमय जाहलें अवघं रण । संशप्तकवीरश्रीठाण । उठोनी गेले दिगंता. ॥ ३० ॥ रणतडाग नलिनीवीर । पार्थप्रताप द्विरदेश्वर । मर्दानी करूनियां चकचूर । क्षणा एका टाकिले. ॥ ३१ ॥ ‘साधु ! साधु ! इहीं शब्दीं । पूजिते जाहले वीरमांदी । इंद्र, यम कुबेर, युद्धी । माघारले दैत्यांच्या. ॥ ३२ ॥ तया करूनी विगत दशा । भ्रष्ट केलें संग्रामकोशा । अर्जुनयरों भरिल्या दिशा । नाहीं वीर यापाडे. ॥ ३३ ॥ भग्न करूनि संशप्तका । फाल्गुन निघाला द्रोणा निका । पाठी त्रिगर्त फोडुनी हाका । दळेसहित लोटले. ॥ ३४ ॥ ‘आम्हां वळोनी संग्रामा । जाणे केवीं ? स्वधर्मगरिमा । पुरुषार्थाची हेची महिमा ।। शूरकर्मा अयोग्य.' ।। ३५ ॥ ऐसी ऐकोनी वाणी । बोले हरीसी स्मितवदनी ।। म्हणे, ‘अनंता ! आनंदगुणी । श्रुतिशास्त्रां न लभेची. ॥ ३६ ॥ अठरा पुराणे महाप्रौढी । वर्णना निघतां जालीं वेडीं । सहस्रमुखाची गरिमा गाढी । वर्णितां जिव्हा द्विभाग. ॥ ३७ ॥ तो तू पूर्णब्रह्म अव्यक्तव्यक्ती । सगुण जालासी कैवल्यपती । आमुते वोळलासी कृपामूर्ती । कोण भाग्यें ? कळेना. ॥ ३८ ॥ पाहें, पाहें, जगनिवासा ! । त्रिगर्त करिती घोर घोषा । काळे वोढिले मृत्युपाशा। न्यावया स्वर्गा आवडी. ॥ ३९ ॥ जैसा पथीं जातां मत्त कैरटी । भुंकत श्वाने लागती पाठी । की स्त्रिया ताडित गेली हटी । बोटें मोडिती कडकडां. ॥ ४० ॥ ना तो मार्ग क्रमितां विशाळफणी । वायस गर्जत धांवत ध्वनी । कीं यंत्रं आवाज जाहलिया गुणी । पॅडसाद साधां ग. डाडी. ॥ ४१ ॥ तैसियापरी रमारंगा !। त्रिगर्त लागले आमच्या मागां । प्रेरिजे रथ वीरदांगा । बोल उघडा मृत्यूचा. ॥ ४२ ॥ अश्वरश्मी ऐकतक्षणी । डोलतां रथ भिडविला रणीं । किलकिलाट वीरश्रेणी । वर्षते जाहले शस्त्रांतें. ॥ ४३ ।। गांडीव वाहोनी वीर अर्जुन । सुशर्मा विधिला सात १. मंत्राक्षरांच्या उच्चारासह. २. पाडती, वर्पती. ३. चेपली, चेंगरली. ४. चिडवून किंवा फसवून. ५. शेषाची, ६. प्रसन्न झालास. ७. हत्ती. ८. तोफ. ९. प्रतिध्वनि, १०. वीरांचे समट