५० नरहरिकृत। [द्रोणपर्व विचारदायक रमापती । सेव्य विबुधाविबुधाते. ॥ ८ ॥ ‘वंद्य अमरां घेरामरां ।। अमरत्व प्राप्त ज्यांचेनि सुरां । अमरावती विबुधेश्वरा । राजभोग प्रसादें. ॥ ९ ॥ अष्टमहासिद्धि विनीत चरणीं । पुढे उभ्या जोडूनी पाणी । तो शैलजारमण शूळपाणी । ध्यानीं निमग्न जयाचे. ॥ १० ॥ जलजनाभ, जलनिधिशयन । जलजारमण, जलजनयन । जलजपाणी, जलजशमन । जळोदर भवाची. ॥ ११ ॥ तो समक्ष माझिये रथीं । असतां कोण पुसे युक्ती ?' । स्मितहास्य प्रसन्न चित्तीं । बोलता जाहला हरीतें. ॥ १२ ॥ म्हणे, ‘माधवा ! रमारमणा! । भगदत्ते पीडिली आमुची सेना । द्विपकिंकाट प्रळयघना। प्राय श्रवणा येतसे. ॥ १३ ॥ गजराज दुर्धर अतुर्बळी । सर्व सेना आणिली धुळी । जावे तिकडे, [तरी] दानवी फळी । धरुनी आली युद्धाते. ॥१४॥ दोहींमाजी कृत्य आधीं । कोणते करावे ? सांगिजे बुद्धी' । हांसोनी बोले कृपानिधी । “पराभविजे दैत्येंद्रा.' ॥ १५॥ गांडीवाते चढवितां मेढी । देवें अश्व प्रेरिला पुढा । वीरीं घातला शरांचा वेढा । जेवीं मैनाकसमुद्रीं. ॥ १६ ॥ चवदा सहस्र बळी असुर । त्रिगर्तराज अयुतवीर । गोपाळगण सहस्र चार । पाथरथा वेष्टिले. ॥ १७ ॥ दानवीं करुनि वैरवाळा । बाण सोडिले अग्निमाळा । भरूनी काढिलें दिग्मंडळा। मंडप नभा घातला. ॥ १८ ॥ निबिड अंधार घनापरी । आच्छादिला रंजनीवैरी । शर झमकती नक्षत्रसरी । हँवयीकिरणासारिखे. ॥ १९ ॥ चहूकडूनी सुसाट भाली । स्यंदनासहित वनमाळी। बुजोनी गेला किरीटमौळी । धरणी कांही दिसेना. ॥ २० ॥ जैसा धेई आच्छादिजे हेळी । कीं चंद्रमंडळ घन झाकोळी। ना ते वस्त्रे हरितां पांचाळी । अंगप्र उघडे दिसेना. ॥ २१ ॥ कीं गोवर्धन धरूनी हेळी । गोकुळ झांकिलें तयातळीं । ना ते खांडवीं बागमाळी । वन्हिकोपी आच्छादिला. ॥ २२ ॥ नेसियापरी धनंजया । झांकिलें, कोठे न दिसे काया। दैत्यसेना पिटोनी बाह्या । हर्षानंदें नाचती. ॥ २३ ॥ निबिड बाणांची घोर वृद्धी । रथ थोकले तये संधी । मोह पावला त्रिजगनिधी । रमारमण श्रीकृष्ण. ॥ २४ ॥ पा राना, पाचा उदधी । ब्रह्मास्त्र योजिलें बाणसंधी। गांडीव कर्पोनी आकर्ण क्रोध । १. सुरासुरांना, देव व राक्षस यांस. २. भूदेवांस. (ब्राह्मणांस.) ३. पर्वतकन्येचा (पार्वतीचा) पति, शंकर. ४. रमारमण, लक्ष्मीकान्त. ५. धनुष्याची दोरी. मेढा' हा शब्द मुक्तेश्वराच्या काव्यांतही आढळतो. (विराटपर्व-अ० ६।१३२ पहा.) ६. वरचढपणा, चाल. ७. सूर्य. ८. चंद्रज्योतीच्या किरणांप्रमाणे, ९. धुक्याने. १०. लीलेने. ११. ज्याची देवता ब्रह्म आहे असे अस्त्र, हें अस्त्र द्रोणाचार्यांनी प्रसन्न होऊन अर्जुनास दिले होते. ।
पान:महाभारत.pdf/67
Appearance