पान:महाभारत.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ अध्याय] महाभारत, ४९ वीर लपती सांदोसांदीं । एकमेकां आश्रय. ॥ १२७ ॥ अंकुश स्पर्शानियां मूर्धी । भगदत्त वर्षे तीक्ष्ण बाणीं । दोन्हीकडूनियां जाचणी । वीरां सावर धरेना. ॥ १२८ ॥ माधवमासी उष्ण पीडे । आँवा वांछिती साउली झाडे । की शीतीं पीडितां माकडें । लक्षिती आश्रा वन्हीचा; ॥ १२९ ॥ तैसे अर्दित सर्व वीर । न धरुनी धीर निघाले सैर । गजेंद्र विचरी चक्राकार । सैरावैरा धुमाळी. ।। १३० । पूर्वी सुरांची सबळ सेना । विरोचने आणिली रणा । तैसी दशा भूपाळगणा । जाली, पांडवां आश्चर्य. ॥ १३१ ॥ असो. पुढां पर्वतारी। अनुजसखा प्रतापगिरी । काळखंज दैत्य समरीं । प्रतापें जेणे मर्दिले, ॥ १३२ ॥ तो सव्यसाची विक्रमतरणी । वीरवर्य मुगुटमणी । येउनी मुक्तिप्रदानीं । भगदत्तगजा बोळवी. ॥ १३३ ॥ हें निरूपण रसाळ गोड । वीररसाचे सुफळित झाड । ऐकतां श्रोतियांचे पुरे कोड । आस्ता वाढे श्रवणार्थी. ॥ १३४ ॥ श्रीगुरुराज वंदोनी, पाणी । मस्तकीं मिरवतां, प्रफुल्लवाणी । नरहर मोरेश्वर श्रोत्यांलागुनी । कथाकुसुम समर्पो. ॥ १३५ ॥ अध्याय सातवा. संजय म्हणे, ‘नरमंडणा! । पुसिला वृत्तांत आणिला मना । पुढे पार्थ प्रतापराणा । काय करी ? ऐकिजे. ॥ १ ॥ द्रोणसमरी महा गर्दी । आक्रंदमान चमूमांदी । दुःशब्द शब्द गर्जती संधी । किलकिलाट बीभत्स. ॥ २ ॥ समुद्रप्राय घनगर्जना । भगदत्तद्विप फोडी त्राणा । पडसादा गिरि दणाणा । खेचर दिशा लंघिती. ॥ ३ ॥ ऐसी ऍतनेची खळबळ । ऐकोनी पार्थचित्त डहुळ । “भगदत्तहस्तीची कीळ । महारुद्रा भयकारी. ॥ ४ ॥ इंद्रवरद प्रभिन द्विरद । सदैव मस्त, नुतरे मद । समरांगण पृतना खेद । पावली असे. निश्चय. ॥ ५ ॥ आमचा राजा धर्मराज । सत्वसिंधु ऐश्वर्यबीज । काय करील काज ? । जावें सत्वर संकटीं.' ॥ ६ ॥ ऐसा चिंतितां हृदीं भावो । जातां संशप्तकीं फोडिला टाहो । निशाणा घालोनियां घावो । आडवे जाले। पार्थाते. ॥ ७ ॥ फाल्गुन पडिला संशयावतीं । द्विधा संकट जालें प्राप्ती । १. सांधी कोंदींत. २. अवसान, धैर्य. ३. चैत्रवैशाखांत. ४. गाई, ५. येथे मूळांतील सव्वीसावा अध्याय संपतो. ६. पर्वतशत्रु (इंद्र) त्याचा अनुज (धाकटा भाऊ, विष्णु) आहे सखा (मित्र) ज्याचा तो (अर्जुन). ७. आस्था, काळजी. ८. सैन्याची. ९. रणभेरीवर. 'निशाण' हा शब्द याच अर्थी तेधरानेही योजिला आहे:-सज्ज केली चातुरंग सेना। घाव घालोनि निशाणा । अश्व, कुंजर, रथिये नाना । शस्त्रास्त्री सिद्धले, ॥ [आदिपर्व-अ० ३२।५.] ६ न० द्रो०